शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘राज’कारणाचा उडाला धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 20:21 IST

मनसे मिशन औरंगाबादबाबत महत्त्वाचे धोरण आखणार

ठळक मुद्देमहावीर चौक, क्रांतीचौक, गुलमंडी ते टीव्ही सेंटरपर्यंत रॅली कार्यकर्त्यांच्या दंडावर ‘राज’मुद्रा

औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद शहरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि राजमुद्रा प्रतिबिंबित भगवा ध्वज हाती घेतल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच जंगी रॅली काढून महावीर चौक ते क्रांतीचौकमार्गे गुलमंडी-औरंगपुरा ते टी.व्ही.सेंटरपर्यंत ‘राज’कारणाचा धुराळा उडविला. मनसेप्रमुख ठाकरे हे तीन दिवस येथे मुक्कामी असून, यानिमित्ताने ते मिशन औरंगाबादबाबत महत्त्वाचे धोरण आखणार आहेत. 

१४ रोजी ठाकरे हे शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी दिवसभर सुभेदारी विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यामध्ये संघटन, पालिका निवडणुका व इतर बाबींचा समावेश असेल. शनिवारी शहरातील महत्त्वाच्या हिंदुत्ववादी संघटना आणि एनजीओंसोबत काही महत्त्वाच्या मुद्यांवर बैठक होईल. तसेच इंग्रजी संस्थाचालक संघटनेच्या मेळाव्याच्या उद्घाटनास ते हजर राहणार आहेत. सर्वंकष चर्चेनंतर मनपा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका ठरू शकते. १६ रोजी ठाकरे यांचा दौरा संपेल.

सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ठाकरे शहरात दाखल झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे महावीर चौक येथे जंगी स्वागत केले. तेथून पुढे क्रांती चौक, गुलमंडी, टी.व्ही. सेंटर या शिवसेनेचे प्रभुत्व असलेल्या भागातून त्यांची रॅली गेली. ठाकरे हे कारमधून हात जोडून समर्थकांचे स्वागत स्वीकारत होते. काही ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. तेथे ठाकरे हे कारमधून खाली उतरले. टी.व्ही.सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून जालना रोडवरील एका हॉटेलात मुक्कामास ठाकरे आले. ठाकरे यांच्यासोबत अनिल शिदोरे, बाळा नांदगावकर, आ.राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अभिजित पानसे, जावेद शेख, सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, भास्कर गाडेकर, बिपीन नाईक, गौतम आमराव, वैभव मिटकर, संकेत शेटे, संदीप कुलकर्णी, राज काथार यांच्यासह पक्षात प्रवेश केलेले माजी आ. हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे, प्रकाश महाजन हेदेखील रॅलीमध्ये होते. दरम्यान रॅलीत सहभागी झालेल्या काही पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे पाकीट, मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना घडल्या. 

कार्यकर्त्यांच्या दंडावर ‘राज’मुद्रारॅलीमध्ये सहभागी झालेल्या मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या दंडावर ‘राज’ मुद्रेचे बॅण्ड लक्षवेधी होते. गुलमंडीत रॅली आल्यानंतर शेवटचे टोक पैठणगेटच्याही अलीकडे होते. रॅलीचा मार्ग भगव्या ध्वजांनी न्हाऊन निघाला होता. ठाकरे यांच्या दौऱ्याचे औचित्य साधून मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गळ्यात भगवे रुमाल, भगवे झेंडे आणि फेटे आणि दंडावर बॅण्ड लावून ठाकरे यांच्या रॅलीत समर्थक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमध्ये तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादGulmandiगुलमंडीShiv SenaशिवसेनाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना