शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 09:41 IST

उद्धवसेनेचे अनेक कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक असल्याची व ते राज ठाकरे यांना भेटून चर्चा करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी शनिवारी सुभेदारी गेस्ट हाऊसवर मराठवाड्यातील सर्व ४६ मतदारसंघांची चाचपणी केली. यासाठी त्यांनी सकाळपासून प्रत्येक मतदारसंघाचे पदाधिकारी, निरीक्षकांशी ‘वन टू वन’ चर्चा केली. दुपारपर्यंत हा सिलसिला चालू राहिला. नंतर ते नाशिककडे रवाना झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलणेही टाळले. 

सकाळी आठ वाजताच  राज ठाकरे यांचे शहरात आगमन  झाले. त्यानंतर सुभेदारी गेस्ट हाऊसवर आले. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोलीतील २५-२५ पदाधिकाऱ्यांशी ते बोलत राहिले. त्या-त्या जिल्ह्यात मनसेच्या शाखा किती, इच्छुक उमेदवार कोण, इतर पक्षांचे उमेदवार कोण-कोण आहेत असा फिडबॅक त्यांनी घेतला. प्रत्येक मतदारसंघात मनसेतर्फे उमेदवार उभे केले जाणार असून, तयारीला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.

अमित ठाकरेही सोबत

राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र अमित ठाकरे, प्रभाकर महाजन, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर तसेच स्थानिक पदाधिकारी सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, अनिकेत निल्लावार, बिपिन नाईक व आशिष सुरडकर, आदींची उपस्थिती होती.

उद्धवसेनेचे कार्यकर्ते?

उद्धवसेनेचे अनेक कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक असल्याची व ते राज ठाकरे यांना भेटून चर्चा करीत असल्याची  जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे