रायुकाँचे दीड तास रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: December 18, 2014 00:35 IST2014-12-18T00:17:10+5:302014-12-18T00:35:19+5:30
जालना : दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख व अन्य ४२ मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी अंबड चौफुली येथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

रायुकाँचे दीड तास रास्ता रोको आंदोलन
जालना : दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख व अन्य ४२ मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी अंबड चौफुली येथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून नंतर जामिनावर त्यांची मुक्तता केली.
दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे शेती पंपाचे व घरगुती वीजबील शंभर टक्के माफ करावे, पुढील सहा महिने वीज बिल वसुली थांबवावी, फळबागा वाचविण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश होता.
प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे अंबड चौफुली दरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.
त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
या आंदोलनात रायुकाँचे जिल्हाध्यक्ष पंकज बोराडे, जयमंगल जाधव, राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बाळासाहेब वाकुळणीकर, अॅड. संजय काळबांडे, रमेश पैठणे, राजेश राऊत, संजय दाड, नूरखान, ठाकूर, वर्षा चंद, नंदू जांगडे, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तनपुरे, विश्वंभर भुतेकर, जयंत भोसले, मिर्झा अन्वर बेग, जयाजी देशमुख, शिवाजी मस्के, कल्याण सपाटे, पांडुरंग जऱ्हाड, नंदकुमार अवकाळे, नंदकुमार गिरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कदीम जालना पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)४
याबाबत पत्रकारांशी बोलताना रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागासाठी ७ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केलेली असली तरी प्रत्यक्षात २ हजार कोटींचीच तरतूद केली आहे. त्यामुळे मोठ्या रक्कमेचा गाजावाजा करीत सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
४उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे हे तातडीने तेथे भेट देण्यास गेले. मात्र मराठवाड्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. जालन्यात रायुकाँने आंदोलन केल्यानंतर आंदोलनस्थळी महसूल विभागाच्या एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याने निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रतिसाद दिला नाही, असा आरोपही पाटील यांनी केला. यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बाळासाहेब वाकुळणीकर, अॅड. पंकज बोराडे, अॅड. संजय काळबांडे, रमेश पैठणे आदी उपस्थित होते.