आंबेडकरांचे स्मारक उभारणार
By Admin | Updated: August 15, 2014 01:37 IST2014-08-15T01:32:50+5:302014-08-15T01:37:28+5:30
कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच

आंबेडकरांचे स्मारक उभारणार
कळंब : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आधारित लोकशाही चौकट बनविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच वाटचाल करण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. जिल्ह्यातील कसबे-तडवळे येथे बाबासाहेबांचा पावनस्पर्श झाला आहे. त्यामुळे तेथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणाही यावेळी चव्हाण यांनी केली.
कळंब नगर परिषदेच्या वतीने शहरातील पं. जवाहरलाल नेहरू बालोद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र भिख्खू संघाचे उपाध्यक्ष भंत्ते उपगुप्त महाथेरो, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, पं.स. सभापती छायाताई वाघमारे, उपसभापती लक्ष्मण आडसूळ, नगराध्यक्ष मिराताई चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, माजी आमदार दयानंद गायकवाड, यशपाल सरवदे, दगडू धावारे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, डॉ सुनील गायकवाड, ब्रिजलाल मोदाणी, जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, विश्वास शिंदे, लक्ष्मण सरडे, आप्पासाहेब शेळके, भागवत धस, पांडुरंग कुंभार, शिल्पकार निरंजन मडिलगेकर आदींची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची चौकट बळकट करण्याचे कार्य राज्यघटनेच्या माध्यमातून केले.
सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना समान संधी देणारे ‘एक व्यक्ती, एक मत’ हे धोरण त्यांनी अवलंबिले. सर्वसामांन्या केंद्रबिंद मानून त्यांनी काम केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश त्यांनी दिला. या महामानवाचा पुतळा उभा करून कळंब नगर परिषदेने शहरवासियांची मागील पंचेवीस वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळत राहिल, असा विश्वास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)