दुष्काळी प्रश्नावर आवाज उठविणार

By Admin | Updated: November 16, 2014 00:36 IST2014-11-16T00:21:44+5:302014-11-16T00:36:19+5:30

जालना : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविणार असून त्यासंदर्भातील उपाययोजना तातडीने करण्यास शासनाला भाग पाडणार

To raise voice on drought issue | दुष्काळी प्रश्नावर आवाज उठविणार

दुष्काळी प्रश्नावर आवाज उठविणार


जालना : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविणार असून त्यासंदर्भातील उपाययोजना तातडीने करण्यास शासनाला भाग पाडणार असल्याची ग्वाही विधानसभेतील शिवसेना विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.
विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात पाहणी करण्यासाठी शनिवारी जालना जिल्ह्यास भेट दिली.सकाळी जालन्यात आ. अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.
शिंदे यांच्यासमवेत शिवसेनेचे आ. अनिल शिंदे, आ. सदाभाऊ सरवणकर, आ. अजय चौधरी, आ. बालाजी किनीकर, आ. मंगेश पुंडलकर, आ. तुकाराम काटे, आ. विजय शिवतारे आदींचा समावेश होता.
आ. खोतकर यांनी या सर्व आमदारांचेही स्वागत केले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात आ. खोतकर तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी शिंदे यांना माहिती दिली.
यावेळी पंडितराव भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, भरत गव्हाणे, दिनेश फलके यांची उपस्थिती होती.
यानंतर विरोधी पक्षनेते शिंदे यांनी मंठा येथे नागरिकांची भेट घेऊन संभाव्य दुष्काळी परिस्थितीसंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला.
याप्रसंगी आ. खोतकर, जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, तालुकाप्रमुख प्रसाद बोराडे, सभापती संतोष वरकड, कृउबा उपसभापती प्रल्हाद बोराडे, पं.स. सदस्य प्रदीप बोराडे, शहरप्रमुख सचिन बोराडे, गणेश बोराडे, भगवान बोराडे, अमोल मोरे, विशाल देशमुख, विनायक चव्हाळ, शिवाजी बोराडे, गजानन बोराडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: To raise voice on drought issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.