अडाणीपणा रोखणारी यंत्रणा उभारा -ढाले

By Admin | Updated: March 28, 2016 00:12 IST2016-03-28T00:02:55+5:302016-03-28T00:12:12+5:30

उस्मानाबाद : बुद्ध धम्माचा गाभा हा अध्यात्म नव्हे तर ज्ञान आहे. मात्र त्यानंतरही काहीजणांकडून जाणते-अजाणतेपणे काही चुकीच्या गोष्टी मांडल्या जातात.

Raise the obstructive machinery | अडाणीपणा रोखणारी यंत्रणा उभारा -ढाले

अडाणीपणा रोखणारी यंत्रणा उभारा -ढाले


उस्मानाबाद : बुद्ध धम्माचा गाभा हा अध्यात्म नव्हे तर ज्ञान आहे. मात्र त्यानंतरही काहीजणांकडून जाणते-अजाणतेपणे काही चुकीच्या गोष्टी मांडल्या जातात. या प्रकारामुळे काही बौद्ध भिक्खू मार्फत धम्मात नवी चातुर्ण्यव्यवस्था तर निर्माण होणार नाही ना? असा सवाल करीत, बाबासाहेबांनी भिक्खुबद्दल जे पाच प्रश्न उपस्थित केले होते. त्याचे उत्तर १२५ व्या जयंतीनिमित्त शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे परखड मत दलित पँथरचे संस्थापक तसेच ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांनी नोंदविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने शहरातील लेडीज क्लबच्या मैदानावर आयोजित दुसऱ्या धम्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. धम्मात कधी-कधी अडाणीपणा जोपासणाऱ्या बाबी काही जणांकडून घडतात. त्या रोखणारी यंत्रणा उभारण्याची आवश्यकताही ढाले यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांनी मनुष्याच्या सर्वांगिण विकासासाठी संपूर्णपणे वैज्ञानिक असलेल्या धम्माची कास धरली. धम्मामुळे, चळवळीमुळे एखादा मंत्री व्हावा, एखादा आमदार व्हावा अथवा एखादा करोडपती व्हा असा संकुचित विचार त्यांचा नव्हता तर समस्त वंचित समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्चिले. समाजातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांनी दिलेला हा विचार घेवूनच पुढे गेले पाहिजे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तेर हा शब्द मूळ लॅटीन भाषेत असून, त्याचा मराठीत अर्थ मातीची भांडे तयार करणारा असा आहे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचा हस्ती दंत तेर येथे स्तुपात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे येथे भव्य स्तुप उभे करण्यासाठी जनतेने आवाज उठविला पाहिजे व सरकारने तो उभा करुन देणे आपले कर्तव्य समजले पाहिजे असेही ढाले यावेळी म्हणाले. बुद्धांनी क्रांती केली. परंतु येथील ब्राम्हणांनी प्रतीक्रांती केली आहे. ते स्वत:ला आर्र्य, हिंदू व ब्राम्हण असल्याचे सांगतात. मात्र कोणत्याही एकावर ठाम रहात नाहीत. ज्यांना कोणताही इतिहास नाही ते ब्राम्हण असतात अशी टिपन्नीही ढाले यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Raise the obstructive machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.