चार दिवसांपासून पावसाची रिपरिप

By Admin | Updated: July 23, 2014 00:19 IST2014-07-22T23:29:12+5:302014-07-23T00:19:17+5:30

हिंगोली : जिल्ह्यात मागील चार दिवसांत सोमवारी सर्वाधिक ७ मिमी पाऊस झाला. दररोज अगदी सकाळपासून सायंकाळपर्यंत हलक्या स्वरूपात होत असलेला पाऊस रात्रभर रिपरिप लावित आहे.

Rainy reaper from four days | चार दिवसांपासून पावसाची रिपरिप

चार दिवसांपासून पावसाची रिपरिप

हिंगोली : जिल्ह्यात मागील चार दिवसांत सोमवारी सर्वाधिक ७ मिमी पाऊस झाला. दररोज अगदी सकाळपासून सायंकाळपर्यंत हलक्या स्वरूपात होत असलेला पाऊस रात्रभर रिपरिप लावित आहे. मंगळवारी ही स्थिती कायम राहिली असल्याने या रिमझिममुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांवर परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात ११ जुलैै रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाचे आगमन झाले होते. तद्नंतर सलग चार दिवस हा पाऊस कायम राहिल्याने उत्पादकांनी खरीप हंगामाच्या पेरणीला सुरूवात केली होती.
दरम्यान, ११ जुलै रोजी २.९६ मिमी, १२ जुलै रोजी २.९९ मिमी असा हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर पावसात थोडी वाढ झाल्याने १३ जुलै रोजी जिल्ह्यात १२.६२ मिमी पाऊस झाला. १४ जुलै रोजी पावसात सातत्य राहिल्याने दिवसभरात ३.७९ मिमी पाऊस झाला. पुढे १५ जुलै रोजी नावालाच पाऊस झाल्याने २.२ मिमी सरासरीनंतर सलग तीन दिवस पाऊस गायब झाला होता. अचानक पाऊस गायब झाल्याने पेरणी थांबविण्याची वेळ आली होती; पण १९ जुलै रोजी पुन्हा आगमन झालेल्या पावसात सातत्य राहिले. मागील चार दिवसांपासून पाऊस होत असताना सरासरीत मात्र वाढ झालेली नाही. १९ जुलै रोजी ४.७१ मिमी तर २० जुलै रोजी दिवसभर झालेल्या पावसाने पेरणीवर फारसा परिणाम झाला नाही. या सर्वांपेक्षा अधिक पाऊस २१ जुलैै रोजी झाला. सोमवारी सकाळी सुरूवात झालेला पाऊस रात्रभर पडला. सर्वदूर असलेल्या या पावसामुळे जिल्ह्याची सरासरी ७६.७१ मिमीपर्यंत गेली. प्रामुख्याने वसमत तालुक्यात सर्वाधिक १२ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल औंढा तालुक्यात झालेल्या ८ मिमी पाऊस झाला. चार दिवसांपासून पाऊस होत असला तरी अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा उत्पादकांना आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
जिल्ह्यात आतापर्यंत ७६.७१ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे झाली नोंद.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून झाले स्पष्ट.
जिल्ह्यातील एकही नदी-नाले आतापर्यंत वाहिले नसल्याने मोठ्या पावसाची जिल्हावासियांना लागली प्रतीक्षा.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी सुटला.
बोअर, विहिरींची पाणीपातळी मात्र वाढेना.

Web Title: Rainy reaper from four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.