रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे

By Admin | Updated: June 28, 2016 00:57 IST2016-06-28T00:37:22+5:302016-06-28T00:57:52+5:30

औरंगाबाद : चेन्नईच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिकेने शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकाला सक्तीचे करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

Rainwater harvesting is compulsory | रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे

रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे

मुख्यमंत्र्यांना निवेदन : सात संघटनांनी केली मागणी
भंडारा : येथील जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची भंडाराहून पुणे येथे झालेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, भंडारा येथील त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत राहू द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील सात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार धीरजकुमार यांची एक वर्षापूर्वीच भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र वर्षभराच्या आतच त्यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होताच त्यांनी अनेक लोकोपयोगी कामाला झपाट्याने सुरुवात केलेली होती. शासनाच्या विविध योजनांची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी निकाली काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले आहे. वेळप्रसंगी अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या न्याय प्रश्नांकरिता त्यांनी स्वत: पुढाकार घेतला. त्यांच्याकडे गाऱ्हाणे घेऊन आलेल्यांचे गाऱ्हाणी ते लक्षपूर्वक ऐकून घेवून ती दूर करण्यासाठी ते तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत. सर्वांकरिता त्यांचे लक्ष रितसर खुले होते. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांच्याकडे जाण्यास मुळीच भीती वाटत नसे. त्यामुळे अल्पावधीतच ‘‘लोकप्रिय जिल्हाधिकारी’’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. या जिल्ह्यात बरीच चांगली व विकासात्मक कामे करण्याचा त्यांचा मानस होता. बेकायदेशिर कामाकडे त्यांची करडी नजर होती. भंडारा सारख्या मागास जिल्ह्यात त्यांच्यासारखा दूरदृष्टी, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक जिल्हाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य कॉस्ट्रॉईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा पदाधिकारी अमृत बन्सोड, गुलशन गजभिये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडी अँड रिसर्च सेंटरचे महेंद्र गडकरी, असित बागडे, बौद्ध साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे प्रतिक रामटेके, सिनीयर सिटीझन मल्टीपरपज असोसिएशनचे संजय बन्सोड, रुपचंद रामटेके, इंडियन बुद्धीस्ट कॉन्सीलचे संयोजक संजय बन्सोड, बॅकवर्ड क्लास हाऊसिंग को आॅपरेटीव्ह सोसायटीचे पदाधिकारी महादेव मेश्राम, एम.डब्लू. दहिवले व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Rainwater harvesting is compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.