छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट कायम असून हवामान विभागाने शनिवारी (२७ सप्टेंबर) आणि रविवारी (२८ सप्टेंबर) या दोन दिवशी विभागातील आठही जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. त्यानुसार आज सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. उद्या देखील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपले असून मनुष्यहानीसह, पशुधनहानी आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील काही भागात सकाळी, तर काही भागात सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचा अंदाज: वेळ: पावसाची शक्यता असलेले जिल्हे२७ सप्टेंबर: स. ८ ते २ वाजेपर्यंत नांदेड, लातूर२७ सप्टेंबर : दु. २ ते रात्री ८ वाजेपर्यंत धाराशिव, लातूर, नांदेड२७ सप्टेंबर: रा. ८ ते रा. १२ पर्यंत धाराशिव, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी२८ सप्टेंबर: रा. १२ ते सकाळी ६ पर्यंत छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड२८ सप्टेंबर: स. ६ ते दु. १२ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर, बीड.२८ सप्टेंबर: दु. १२ ते सायं. ६ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर
Web Summary : Marathwada faces continued heavy rainfall, with a red alert issued. Extensive damage to life, livestock, and crops is feared. Residents are urged to stay alert as more downpours are expected.
Web Summary : मराठवाड़ा में भारी बारिश का संकट बरकरार है, रेड अलर्ट जारी। जीवन, पशुधन और फसलों को भारी नुकसान की आशंका है। निवासियों से सतर्क रहने का आग्रह किया गया है क्योंकि और बारिश की उम्मीद है।