शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६३५ विद्युत खांब कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:03 IST

अवकाळी पावसाने आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला.

छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने गेल्या आठवडाभरात छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागात महावितरणचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात आठवडाभरात तब्बल ६३५ विद्युत खांब कोसळले. रोहित्रांचेही नुकसान झाले. त्यामुळे अनेक गावे अंधारात बुडाली. मात्र, युद्धपातळीवर काम करून सर्व खांब व रोहित्रे पुन्हा उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

अवकाळी पावसाने आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत केला. छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात उच्च दाब वाहिनीचे ११ व लघुदाब वाहिनीचे ३० विद्युत खांब कोसळले, तर तीन वितरण रोहित्रांची हानी झाली. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात उच्चदाब वाहिनीचे २१३ व लघुदाब वाहिनीचे ३८१ विद्युत खांब कोसळले, तर २१ रोहित्रांची हानी झाली. सर्व खांब व रोहित्र उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे महावितरणने सांगितले.

रात्रभर ३८ किमी पायपीट करून वीजपुरवठा पूर्ववतवैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे ३३ केव्ही लोणी वाहिनीवर जरुल फाटा, खंडाळा, कोल्ही येथे वीज पडून पिन इन्सुलेटर बिघडले. त्यामुळे शिऊर, लोणी व भादली या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी लगेचच युद्धपातळीवर काम सुरू केले. रात्रभर पावसात ३८ किमी लांबीच्या या वाहिनीची चिखल तुडवत तपासणी केली. रात्रीच्या अंधारातही बॅटऱ्यांच्या उजेडात काम सुरूच होते. प्रत्येक विद्युत खांबाची पाहणी केली. त्यात ३५ पिन इन्सुलेटर खराब झालेले आढळले. ते बदलून ४० गावांतील सुमारे १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी दीड वाजता सुरळीत केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरelectricityवीजRainपाऊस