शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

येरे..येरे..पावसा...कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार की नाही याबाबत शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 17:18 IST

महसूलमंत्री बोलेनात, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तोंडावर बोट

ठळक मुद्दे राज्य शासनाने तीस कोटी रुपयांची तरतूद आधीच केलीय जाहीरनिर्णयाबाबत कुणीच बोलेना

औरंगाबाद : महाराष्ट्रात यावर्षी कमी-अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी राज्य शासनाने ३० कोटींची तरतूद केली. मात्र, या प्रयोगाचा निर्णय होणार की नाही याबाबत सारेच गुलदस्त्यात आहे. 

जुलै अखेर ते आॅगस्टअखेरपर्यंत महिनाभर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी मागविण्यात आलेल्या निविदा जून महिन्यात उघडण्यात येणार होत्या. निविदा अंतिम न झाल्यामुळे प्रयोगाचा निर्णय अधांतरी राहिला. ५ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉपलर व रडार दाखल होणार होते. राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़मी. च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे औरंगाबाद विमानतळावरून कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमान उड्डाण करण्याबाबत निर्णय झालेला आहे.  

२०१५ मध्ये औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, त्यातून फारसा लाभ झाला नव्हता. चार वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगातून १५ ते २० टक्के पाऊस जास्तीचा पडला होता, असा दावा मदत व पुनवर्सन विभागाने त्यावर्षी केला होता. २०१५ मध्ये औरंगाबाद येथे १०० तासांवर १०० तास मोफत या तत्त्वावर ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता २७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले होते. औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर २०१७ मध्ये सोलापूर येथे केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने प्रयोगासाठी प्रयत्न झाले होते. 

निर्णयाबाबत कुणीच बोलेना १५ जून रोजी निविदेवर निर्णय होऊन कंत्राटदार कंपनीचा निर्णय होणार होता; परंतु निविदेच्या अनुषंगाने नेमण्यात आलेले समिती सदस्य वेगवेगळ्या कारणांमुळे राज्याबाहेर होते. त्यामुळे निविदा अंतिम झाल्या नाहीत. त्यापुढे काय झाले याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ४कृत्रिम पावसाच्या निर्णयाचे काय झाले, याची प्रतिक्रिया हवी आहे. यासाठी महसूलमंत्र्यांच्या स्वीय सहायकांकडे बुधवारी सकाळी निरोप दिला होता. सायंकाळपर्यंत त्यांना ७ वेळा संपर्क केला. मात्र, महसूलमंत्र्यांशी संपर्क होऊ शकला नाही. यावलकर यांना मोबाईलवर संदेश देऊन तसेच वारंवार फोन करुनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद