शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

महानगरपालिकेच्या ‘बजेट’मध्ये पैशांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 11:55 IST

गेल्या वर्षी ८३१ कोटींचे अंतिम बजेट; यंदा २0२0 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक

ठळक मुद्देपाणीपुरवठा, जलसिंचनाला प्राधान्यशिक्षण, आरोग्यावर भरीव तरतूदगतवर्षीची २०० कोटींची कामे रद्द१ हजार कोटी रुपये अनुदान अपेक्षित

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी  २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेच्या ३८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात अधिक रकमेचा म्हणजे तब्बल २०२० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी यांना सादर केला. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरवासीयांना महापालिकेने पैशांचा पाऊस पाडत चिंब भिजवून टाकले.

२०१८-१९ या आर्थिक वर्षात महापालिकेने तब्बल १,८६३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला होता.  वर्षअखेरीस ८३१ कोटी ४३ लाख रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पावर थांबण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. २०२० कोटींच्या अर्थसंकल्पात महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न एक हजार कोटी गृहीत धरण्यात आले. १ हजार कोटी शासन अनुदानाचा समावेश आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात राजकीय मंडळींकडून घुसडण्यात आलेली २०० कोटी रुपयांची विकासकामे मनपाच्या आर्थिक परिस्थितीमुळे रद्द करण्याची हिंमत यंदा प्रशासनाने दाखविली.

१ एप्रिलनंतर सुरू  असलेल्या १४० कोटींच्या कामांचा नवीन अर्थसंकल्पात समावेश केला आहे. स्पीलची कामे रद्द केल्याने नवीन राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात पाणीपुरवठा योजना, जलसिंचन, ग्रीन औरंगाबाद, शौचालये, सफारीपार्क, शिक्षण, आरोग्य आदी विकासकामांवर भरीव आर्थिक तरतूद केली आहे. प्रशासनाचे आकडे पाहून स्थायी समिती सदस्यही अचंबित झाले. रस्ते, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून अनुदान मिळणार असल्यामुळे आकडा वाढला असल्याचा खुलासा आयुक्तांनी केला. मनपावर आधीच कर्जाचा डोंगर आहे. त्यात आणखी ११५ कोटींचे कर्ज घेतले जाणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. भूमिगत गटार योजनेसाठी ४५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

४९ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रकशुक्रवारी सकाळी आयुक्त डॉ. विनायक, मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे, लेखाधिकारी संजय पवार, उपायुक्त मंजूषा मुथा यांनी स्थायी समितीकडे अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आयुक्तांनी पॉवर पॉइंट प्रझेंटेशनद्वारे अर्धा तास अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्यांवर माहिती सादर केली. अर्थसंकल्पात २,०२०.५४ कोटी रुपये जमा, तर २,०१९.७५ कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. ४९ लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. 

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद