परभणी जिल्ह्यात रिमझिम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:48 IST2017-08-20T00:48:31+5:302017-08-20T00:48:31+5:30

दोन महिनच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिमझिम सुरुच होती. त्यामुळे रस्ते चिखलमय झाले होते.

Rainfall in Parbhani district | परभणी जिल्ह्यात रिमझिम पाऊस

परभणी जिल्ह्यात रिमझिम पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन महिनच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिमझिम सुरुच होती. त्यामुळे रस्ते चिखलमय झाले होते.
शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भूरभूर पावसाला सुरुवात झाली. परभणीसह पालम, गंगाखेड, पाथरी, मानवत, पूर्णा आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. महसूलच्या नोंदीनुसार सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. सायंकाळी ६ पर्यंत परभणी तालुक्यात १.५०, पूर्णा २.२०, पालम १, गंगाखेड ४.७५, सोनपेठ- ७, पाथरी १.६७ आणि मानवत तालुक्यात २.६७ मि.मी. पाऊस झाला. जिंतूर आणि सेलू तालुक्यात शनिवारी पाऊस झाला नाही.

Web Title: Rainfall in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.