पावसाने ओलांडली पन्नाशी
By Admin | Updated: September 7, 2014 00:23 IST2014-09-07T00:17:42+5:302014-09-07T00:23:45+5:30
उस्मानाबाद : दीड-दोन महिने ओढ दिलेल्या पावसाने गत काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली असून, जिल्ह्यात आजवर ५०़९ टक्के पाऊस झाला असून,

पावसाने ओलांडली पन्नाशी
उस्मानाबाद : दीड-दोन महिने ओढ दिलेल्या पावसाने गत काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली असून, जिल्ह्यात आजवर ५०़९ टक्के पाऊस झाला असून, त्यामुळे खरिपाची पिके जोमात आली आहेत़ वाशी तालुक्यात सर्वाधिक ७१़१ टक्के तर लोहारा तालुक्यात सर्वात कमी ४२़२ टक्के पाऊस झाला आहे़
चालू वर्षी पावसाने जवळपास दीड-दोन महिन्यानंतर हजेरी लावली़ नंतर गायब झालेला पाऊस गणेश आगमनापूर्वी जिल्ह्यात धडकला़ सलग तीन-चार दिवस जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील १९ साठवण तलाव पूर्णत: भरले असून, इतर साठवण तलावातील पाणीपातळीत वाढ होत आहे़ उस्मानाबाद तालुक्यात ४८़४ (३६३़९) मिमी पाऊस झाला आहे़ यात उस्मानाबाद मंडळांतर्गत ५७६़४ मिमी, तेर - ३०४ मिमी, ढोकी - ३३९ मिमी, बेंबळी - ३३३ मिमी, पाडोळी - २७६़४ मिमी, जागजी - १९५ मिमी, केशेगाव - ३८८, तर उस्मानाबाद ग्रामीण सर्कलमध्ये ५०२ मिमी पाऊस झाला आहे़ तुळजापूर तालुक्यात ४९़५ टक्के (४१४़९) पाऊस झाला आहे़ यात तुळजापूर मंडळांतर्गत ५३९ मिमी, सावरगाव - ४०५ मिमी, जळकोट ३८१़२ मिमी, नळदुर्ग ४९२़ मंगरूळ ३७१ मिमी, सलगरा ३१२ मिमी तर इटकळ मंडळांतर्गत ४०४ मिमी पाऊस झाला आहे़ उमरगा तालुक्यात ४७़१ टक्के (३७६) पाऊस झाला आहे़ यात उमरगा मंडळांतर्गत ५२५ मिमी, मुरूम - ४४६ मिमी, नारंगवाडी - २८७ मिमी, मुळज - ३०६ मिमी, दाळींब ३१६ मिमी पाऊस झाला आहे़ लोहारा तालुक्यात सर्वात कमी ४२़२ टक्के (३३७़३) पाऊस झाला आहे़ यात लोहारा मंडळांतर्गत २७१ मिमी, माकणी २७१़८ मिमी, जेवळी ४११ मिमी पाऊस झाला आहे़ कळंब तालुक्यात ४७़१ टक्के (३३७) पाऊस झाला आहे़ यात कळंब मंडळांतर्गत ३९८ मिमी, इटकूर - २४३ मिमी, शिराढोण ४५९ मिमी, येरमाळा ३३८ मिमी, मोहा ३१० मिमी, गोविंदपूर ३५४ मिमी पाऊस झाला आहे़
भूम तालुक्यात ४५ टक्के (४०७़४) पाऊस झाला आहे़ यात भूम मंडळांतर्गत ५८७़ ईट - ४०७, अंबी ३१३ मिमी, माणकेश्वर २९७ मिमी, वाशी तालुक्यात ७१़१ टक्के (५०३) पाऊस झाला आहे़ यात वाशी मंडळांतर्गत ५२७ मिमी, तेरखेडा ६०५ मिमी, पारगाव ३६७ मिमी पाऊस झाला आहे़ तर परंडा तालुक्यात ६१़६ टक्के (३७९़२) पाऊस झाला आहे़ यात परंडा मंडळांतर्गत ३५९ मिमी, जवळा (नि़) २८०मिमी, अनाळा ४९० मिमी, सोनारी ४३५ मिमी, आसू मंडळांतर्गत ३३२मिमी पाऊस झाला आहे़ (प्रतिनिधी)