जिल्ह्यात तुरळक पाऊस
By Admin | Updated: November 15, 2014 23:54 IST2014-11-15T23:49:48+5:302014-11-15T23:54:25+5:30
हिंगोली : मागील तीन दिवसांपासून अधून-मधून हजेरी लावणाऱ्या अवकळी पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावली.

जिल्ह्यात तुरळक पाऊस
हिंगोली : मागील तीन दिवसांपासून अधून-मधून हजेरी लावणाऱ्या अवकळी पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावली. बहुतांश ठिकाणी पाण्याचे डोह साचले असून काही ठिकाणी ओढे वाहिले आहेत. या पावसाने रबी हंगामाचे पेरणीक्षेत्र वाढणार आहे.
रबी हंगामाच्या पेरणीची वेळ निघून गेली आहे. परिणामी, जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र पेरणीविना आहे. खरिपानेही दगा दिल्याने रबी हंगामही वाया जाण्याची शक्यता होती. त्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या अल्पश: पावसाने दुबार पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. तेव्हापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. शनिवारी दुपारी पावसास सुरूवात झाली. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औंढा तालुक्यातील सरीने काही अंशी पेरणीत वाढ होणार आहे. कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, नांदापूर परिसरात जोरदार पाऊस झाला. वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली. अनेक शेतकऱ्यांची ज्वारी, तूर भिजल्या आहेत. कडबाही भिजला आहे. तर जागोजागी पाण्याचे डोह साचले आहेत. या पावसाने रबीच्या क्षेत्रात लक्षणिय वाढ होणार आहे. जवळपास सव्वादोन लाख हेक्टरवर रबीची पेरणी होणार होती. पाण्याअभावी १० टक्क्यांच्या आत पेरणी झाली होती. आता शेतकरी रबीची पेरणी करण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)