शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

औरंगाबादेत पावसाचा जोर; वीज गुल; यंत्रणा सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:12 IST

शहरात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडविली. जवळपास अर्धे शहर अंधारात होते.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी वृष्टी : नागरिकांना छळण्यात महापालिका आणि महावितरणमध्ये लागली स्पर्धा; शहराचे कसे होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडविली. जवळपास अर्धे शहर अंधारात होते. हर्सूल पॉवर हाऊस येथे ३३ केव्ही केबल निकामी झाल्यामुळे छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा ७ तास खंडित होता, तर बन्सीलालनगर परिसराचा विद्युत पुरवठा तब्बल १२ तासांनंतर पूर्ववत झाला.शहरात काल रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने महावितरणचे पितळ उघडे पाडले. पावसाळ्यात नागरिकांना अखंडित वीज मिळावी म्हणून महावितरणने केलेली मान्सूनपूर्व कामे पावसाअगोदर दिलासा देणारी असली, तरी प्रत्यक्षात मात्र ती वल्गनाच ठरली. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जवळपास अवघे शहर अंधारात बुडाले होते. शहराच्या जुन्या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरणचे शहरात क्रमांक- १ व क्रमांक- २ असे दोन विभाग कार्यरत आहेत. विभाग क्रमांक- १ अंतर्गत छावणी, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भावसिंगपुरा, भीमनगर, पेठेनगर, पडेगाव, बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन, सिल्कमिल कॉलनी, गोलवाडी, सातारा परिसर, देवळाई, रोजाबाग, औरंगपुरा, हर्सूल, जटवाडा रोड, तसेच शहर क्रमांक- २ अंतर्गत भारतनगर, गारखेडा, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, सिडकोतील विविध सेक्टर संपूर्णपणे अंधारात बुडाले. हर्सूल येथे ३३ केव्ही केबल निकामी झाल्यामुळे महावितरणच्या छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा रात्री ११ वाजता खंडित झाला. या उपकेंद्राला हर्सूल पॉवर हाऊस येथून वीजपुरवठा होतो. अभियंते-कर्मचाºयांनी भर पावसात अथक प्रयत्न केले; पण पहाटेपर्यंत केबल दुरुस्त होऊ शकली नाही. अखेर सकाळी दुसºया केबलमार्फत छावणी उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू केला, तेव्हा सकाळी ६ वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत झाला. याच उपकेंद्रांतर्गत बन्सीलालनगरचा विद्युत पुरवठा तब्बल १२ तासांनंतर पूर्ववत झाला. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्यामुळे रात्री त्या परिसरातील तीन फिडर बंद पडले. त्यामुळे संपूर्ण चिकलठाणा औद्योगिक परिसर व लगतचा परिसर तीन तासांहून अधिक काळ अंधारात होता. रेणुकानगर येथील फिडर बंद पडल्यामुळे भारतनगर, हनुमाननगर, तसेच गारखेडालगतच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्नयासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग म्हणाले की, पावसामुळे शहरातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यासंदर्भात महावितरणने सुरू केलेल्या कंट्रोल रूमकडे जवळपास ७० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार महावितरणच्या अधिकारी, अभियंते व कर्मचाºयांनी भरपावसात शर्थीचे प्रयत्न करून ठिकठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत केला. छावणी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील केबल दुरुस्तीला थोडा विलंब लागला.दोन बळी घेतल्यानंतर महापालिकेला जागऔरंगाबाद : शहरातील सर्व धोकादायक मॅनहोल बंद करा, पुलांना सुरक्षा कठडे नसतील तर युद्धपातळीवर ते उभारण्याचे काम सुरू करावे, असे आदेश शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले. जयभवानीनगर, सिडको एन-६ येथे दोन निष्पाप नागरिकांचे बळी घेतल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. धोकादायक बाब कुठेच दिसता कामा नये, असे आदेश आता सर्व वॉर्ड कार्यालयांना बजावण्यात आले आहेत. दरम्यान, शहरात दोन दिवसांत दोन बळी गेल्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल शहरभर संतापाची लाट पसरली आहे.मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर जयभवानीनगर येथे मॅनहोलमध्ये पडून भगवान मोरे या गरीब कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेला उलटून ४८ तासही झालेले नसताना गुरुवारी मध्यरात्री सिडको एन-६ भागातील बजरंग चौकात चेतन चोपडे या ३५ वर्षीय तरुणाचा नाल्यात पडून मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे शहरात महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. जयभवानीनगर येथे धोकादायक नाल्यावर वेळीच ढापे टाकले गेले असते, तर मोरे यांचा मृत्यू झालाच नसता, अशी भावना नागरिक बोलून दाखवीत आहेत.मागील वर्षीही तरुणाचा मृत्यूबजरंग चौक येथे नाल्याच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून नारेगाव येथील १८ वर्षीय गरीब तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही महापालिकेने बोध घेतला नाही. शहरात किमान ३५० ठिकाणी मॅनहोल उघडे असतील. पुलांना कठडे नसलेली ४० पेक्षा अधिक ठिकाणे असावीत, असा अंदाज मनपानेच वर्तविला आहे.

टॅग्स :RainपाऊसMuncipal Corporationनगर पालिकाelectricityवीज