परभणीत १५ मिनिटे पावसाची हजेरी
By Admin | Updated: September 3, 2014 00:03 IST2014-09-02T23:46:56+5:302014-09-03T00:03:49+5:30
परभणी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परभणीसह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़

परभणीत १५ मिनिटे पावसाची हजेरी
परभणी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परभणीसह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ मंगळवारी सायंकाळी परभणीत पावसाने १५ मिनिटे जोरदार हजेरी लावली़ यामुळे सखल भागामध्ये पाणी साचले होते़ खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली़
परभणी येथे दोन-तीन दिवसानंतर मंगळवारी सूर्यदर्शन झाले़ दिवसभर पावसाची उघडीप होती़ दुपारी ३ च्या नंतर ढग दाटून आले़ त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी पडल्या़ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली़ हा पाऊस १५ ते २० मिनिटे पडला़ त्यामुळे शहरात पाणीच पाणी झाले़ महालक्ष्मी सणानिमित्त खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली़ तसेच छोट्या मोठ्या विक्रेत्यांचे किरकोळ नुकसान झाले़