जिल्ह्यात वादळी वार्यासह पाऊस
By Admin | Updated: June 6, 2014 01:04 IST2014-06-06T00:36:37+5:302014-06-06T01:04:34+5:30
लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा आणि चाकूर तालुक्यातील म्हाळंगी या गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला़
जिल्ह्यात वादळी वार्यासह पाऊस
लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा आणि चाकूर तालुक्यातील म्हाळंगी या गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला़ जोरदार वादळी वार्यामुळे धानोरा येथील ५० घरांवरील पत्रे उडाले़ म्हाळंगीत विद्युत तारा तुटल्याने गाव अंधारात राहिले़
बुधवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उष्णता कमी जाणवत होती़ परंतु, गुरुवारी पुन्हा वातावरणात बदल होऊन उन्हाची तीव्रता आणखीन वाढली़ त्यामुळे दिवसभर नागरिक घामाघूम झाल्याचे जाणवत होते़ गुरुवारी सायंकाळी ५़३० च्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथे ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार वादळी वार्यास सुरुवात झाली़ दरम्यान, विजांच्या कडकडाटात अर्धा तास पाऊस पडला़ वादळी वार्यामुळे गावातील जवळपास ५० घरांवरील पत्रे उडून हवेत तरंगत होते़ सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही़ वादळी वार्यामुळे धनराज साखरे, संतोष साखरे यांच्यासह अन्य काही शेतकर्यांच्या शेतातील फळझाडे कोसळली़ काही शेतकर्यांच्या ऊस आडवा झाला़ शिवाजी कनेरे यांच्या शेतातील डाळींबाच्या बागेचे नुकसान झाले़ वादळी वार्यासह जवळपास अर्धा तास पाऊस झाला़
चाकूर तालुक्यातील म्हाळंगी येथेही सायं़ ५़३० च्या सुमारास दहा मिनीटे वादळी वार्यासह पाऊस झाला़ वादळी वार्यामुळे विद्युत तारा तुटल्या़ परिणामी गावात अंधार निर्माण झाला़ तसेच काही झाडेही कोसळली असल्याचे सांगण्यात आले़
बुधवारी दुपारी २ ते २़३० च्या सुमारास औसा तालुक्यातील बहुतांश भागात वादळी वार्यासह पाऊस झाला़ त्यामुळे नागरसोगा , जवळगा (पो), वानवडा व जुना औसा हे चार ३३ के ़व्ही़ उपकेंद्र रात्रभर अंधारात राहिल़ परिणामी या उपकेंद्रातंर्गातील २० ते २२ गावांतील नागरिक घामाघूम झाले़ खंडित वीज पुरवठा गुरूवारी दुपारी सुरळीत झाला़
बुधवारी दुपारी ३३ के ़व्ही च्या ४ उपकेंद्रामध्ये जाणार्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला़ बुधवारी रात्री १० वा़पर्यंत महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्यांनी प्रयत्न करूनही बिघाड सापडला नाही़ त्यामुळे या उपकेंद्रातंर्गतची नागरसोगा, दापेगाव, जवळगा (पो) , दावतपूर, फत्तेपूर, संक्राळ, वानवडा, तुंगी यासह २० गावातील नागरिकांना अंधारात घामाघूम होऊन रात्र काढावी लागली़ या संदर्भात राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम़ एऩ घाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, बुधवारी झालेल्या पावसात वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता़ गुरूवारी दुपारी १२ वाजता या चारही उपकेंद्रातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे़
किल्लारी व परिसरात बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस झाल्याने जवळपास ५५ विद्युत पोल कोसळले़ तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली़ वादळी वार्यामुळे किल्लारी, किल्लारी भाग- २, तळणी फिडर, कार्ला, नदी हत्तरगा, जूने किल्लारी गाव, मोगरगा आदी गावांतील ५५ विद्युत पोल कोसळले़ (प्रतिनिधी)