तुळजापुरात दोन तास पाऊस
By Admin | Updated: September 15, 2014 00:26 IST2014-09-15T00:19:22+5:302014-09-15T00:26:23+5:30
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील जेवळी आणि तुळजापूर परिसरात रविवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

तुळजापुरात दोन तास पाऊस
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील जेवळी आणि तुळजापूर परिसरात रविवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
मागील दहा-बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. असे असतानाच रविवारी सकाळपासूनच तीव्र स्वरुपाचे उन पडले होते. त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. ३.३० वाजण्याच्या सुमारास जेवळी परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस जवळपास पाऊणतास सुरु होता. त्यानंतर माकणी येथेही ५.३० वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. पेठसांगवी येथेही ५.३० वाजण्याच्या सुमारास रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला होता. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी व परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
दरम्यान, तुळजापूर शहर व परिसरातही दहा ते बारा दिवसाच्या विश्रांतीनंतर तब्बल दोन तास जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे रस्त्यावरुन पाणी वाहत होते. हा पाऊस खरीप पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. (प्रतिनिधी)