तिसऱ्या दिवशीही पाऊस; शहरात पाणी पाणी

By Admin | Updated: August 25, 2014 00:22 IST2014-08-25T00:22:29+5:302014-08-25T00:22:52+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेला पाऊस आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू राहिला.

Rain on the third day; Water in the city water | तिसऱ्या दिवशीही पाऊस; शहरात पाणी पाणी

तिसऱ्या दिवशीही पाऊस; शहरात पाणी पाणी

औरंगाबाद : जिल्ह्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेला पाऊस आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू राहिला. शहर आणि परिसरात दुपारनंतर रिमझिम पाऊस झाला. शहरात सायंकाळपर्यंत ५.८ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पुन्हा अनेक भागांत पाणी तुंबले होते. काही घरांमध्ये पाणी शिरले.
शहरात आजही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ वाजेनंतर प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाली. काही भागांत रिमझिम, तर काही भागांत चांगला पाऊस झाला. औरंगपुरा, समर्थनगर, गारखेडा परिसर, हर्सूल, चिकलठाणा, बीड बायपास, सिडको, हडकोसह जवळपास सर्वच भागांत पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. शहराचे कमाल तापमान आज ३८.१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरात रविवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५.८ मिमी पावसाची नोंद झाली.

Web Title: Rain on the third day; Water in the city water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.