सिल्लोड, कन्नड, वैजापूरमध्ये पाऊस

By Admin | Updated: June 23, 2016 01:31 IST2016-06-23T00:54:24+5:302016-06-23T01:31:32+5:30

औरंगाबाद : सिल्लोड शहरासह तालुक्यात बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. आमठाणा, उंडणगाव परिसरातही सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली.

Rain in Sillod, Kannad, Vaijapur | सिल्लोड, कन्नड, वैजापूरमध्ये पाऊस

सिल्लोड, कन्नड, वैजापूरमध्ये पाऊस


औरंगाबाद : सिल्लोड शहरासह तालुक्यात बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. आमठाणा, उंडणगाव परिसरातही सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे बळीराजा सुखावला आहे.
सिल्लोड शहरासह तालुक्यात बुधवारी (दि.२२) दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. गत चार दिवसांपूर्वी झालेल्या अल्प पावसाच्या बळावर परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला होता. बुधवारी झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे.
बुधवारी दुपारी ३ वाजता पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत होता. जोरदार पावसामुळे परिसरातील बळीराजा आता जोमाने पेरणीला लागणार आहे.

Web Title: Rain in Sillod, Kannad, Vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.