तीन दिवसांपासून पाऊस गायब
By Admin | Updated: July 27, 2014 01:17 IST2014-07-26T23:33:54+5:302014-07-27T01:17:02+5:30
हिंगोली : महिनाभराच्या उशिराने दाखल झालेल्या पावसात देखील सातत्य राहिलेले नाही. मागील आठवड्यात तीन दिवसांच्या खंडानंतर आता पुन्हा एकदा पाऊस गायब झाला आहे.

तीन दिवसांपासून पाऊस गायब
हिंगोली : महिनाभराच्या उशिराने दाखल झालेल्या पावसात देखील सातत्य राहिलेले नाही. मागील आठवड्यात तीन दिवसांच्या खंडानंतर आता पुन्हा एकदा पाऊस गायब झाला आहे. परिणामी अल्पश: पावसावर पेरणी केलेल्या कास्तकारांचा जीव टांगणीला लागला असल्याने पावसासाठी धावा केला जात आहे.
जिल्ह्यात गतवर्षी १२ जून रोजी आगमन झालेल्या पावसात खंड पडला नव्हता; पण यंदा महिनाभराच्या उशिराने पावसाचे आगमन झाले होते. परिणामी पेरणीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी पावसासाठी धावा सुरू केला होता. त्यानंतर १२ जुलै रोजी आगमन झालेल्या पावसाने ऊन सावलीचा खेळ सुरू केला. त्यानंतर मागील आठवड्यात तीन दिवस कडक ऊन पडले होते.
सध्या खरीप हंगामाची पेरणी जोमात सुरू असताना पुन्हा पाऊस गायब झाला आहे. २४ जुलैैैैैैैैपासून पावसाचा एक थेंबही जिल्ह्यात पडलेला नाही. आजघडीला जिल्ह्यात ७० टक्के पेरणी आटोपल्याने पावसाची नितांत गरज आहे. दोन तालुके वगळता इतर तालुक्यात १०० मिमी देखील पाऊस झालेला नाही.
२४ जुलैपर्यंत ८१.७२, कळमनुरी ८० मिमी आणि वसमत तालुक्यात ९२ मिमी पाऊस झाला आहे; मात्र सेनगाव १११ तर औंढा तालुक्यात १४३ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी यावेळी ६८४ मिमी पाऊस झाला होता. (प्रतिनिधी)
दमदार पावसाची प्रतीक्षा
ऐन पेरणीच्या काळात पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता.
दुबार पेरणीचे संकट घोंगावत असतानाच पावसाने दिलासा दिला. त्यानंतर सलग तीन दिवस झालेल्या पावसाने सरासरीचे शतक पार केले.
काही भागात पेरणी झाली असल्याने पाऊस गरजेचा आहे.
यंदा तब्बल दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली
अल्पश: पावसावर महागामोलाची बियाणे-खते टाकून शेतकऱ्यांनी जोमाने पेरणी आहे.
अनेक भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
तालुकानिहाय सरासरी (मिमी)
तालुका गतवर्षी यंदा
हिंगोली७२२.१२ ८१.७२
कळमनुरी६३२.८८ ८०.३७
वसमत ६२२.८६ ९२
सेनगाव६३७.०८१११.८४
औंढा८०९.६२ १४३
एकूण३५३६० १०१.८७