शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मराठवाड्यात पावसाची सर्वत्र हजेरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:28 PM

तब्बल दोन महिन्याच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. नद्या, नाल्याला पाणी आले असून अनेक सकल भागात वस्तीमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद : तब्बल दोन महिन्याच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. नद्या, नाल्याला पाणी आले असून अनेक सकल भागात वस्तीमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासात झालेल्या दमदार पावसाने मराठवाड्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. 

 

नांदेड : 

नांदेड - महापालिका आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात पाणी घुसले, निम्मे शहर जलमय, विक्रमी 144 मिलीमीटर पावसाची ( गत 24 तासात ) नोंद.

मुदखेड - शहराचा नांदेड सह इतर तालुक्याशी संपर्क तुटला. मुदखेड शहर जोडणारे प्रमुख राज्य व प्रमुख जिल्हा रस्त्यावर नदी नाल्याचे गेली पाच तासांपासून वाहत आहे पाणी.

धर्माबाद - धर्माबाद येथील तहसिल व भुमीअभिलेख कार्यालयाला  पावसाच्या पाण्याने वेढले . छोटे छोटे पुलावरून पाणी ओसंडुन वाहात आहे. 

आल्लुर गावातील बहुतांश घरात पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे.

लातूर :  देवणी - कालदुपारपासून सुरु झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले. मुख्य पीक सोयाबीनला याचा अधीक फायदा होणार आहे. तर काढणीस आलेल्र्या मुग वुडीद या पिकास या पावसाचा फटका बसनार आहे. 

उस्मानाबाद : जिल्हाभरात शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे लहान-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार  जिल्ह्यातील 16 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये उस्मानाबाद  तालुक्यातील सर्वच्या सर्व आठ मंडळाचा समावेश आहे. तसेच कळंब, परांडा,  उमरगा, तुळजापूर, वाशी तालुक्यातील प्रत्येकी एक तर भूम तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.तुळजापूर - शनिवारी सांयकाळी सहा वाजता सुरु झालेल्या पावसाचा तालुक्यात रात्रभर मुक्काम . त्यामुळे नाले ओढांना पुर , साठवण तलाव व मध्यम प्रक्लपातील पाणी साठयात वाढ ,खरीप पिकास संजीवनी . तालुक्यात तेरा तासात सरासरी ५० मि मी पावसाची नोंद.

परभणी : गंगाखेड - तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारी गंगाखेड परीसरात मध्यम स्वरूपाच्या पाऊसाने हजेरी लावली दिवसभर रिपरिप असलेल्या पाऊसाचा मध्यरात्री जोर वाढला रविवार रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यानंतर पाऊस सामान्य झाला शनिवार व रविवार रोजी सकाळ पर्यंत झालेल्या पाऊसामुळे परिसरातील नदी, नाले भरून वाहू लागले.या पाऊसामुळे गंगाखेड बस स्थानकाला गळती लागली असून बस स्थानक परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे.

 

औरंगाबाद: रात्रभर पावसाची रिपरिप पडल्यानंतर रविवारी पहाटे पावसाने जोर पकडला. औरंगाबादमध्ये मागच्या २४ तासांमध्ये ४१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात भीज पाऊस आहे, शेतीबाहेर पाणी नाही, जमिनीचे पोट भरले, जलसाठे फक्त ओले झाले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास जलसाठ्यात पाणी येऊ शकते, धुके खूप पडल्याने पिकावरील रोग वाढणार आहेत. जळगाव ते औरंगाबाद महामार्गावर धुके खूप आहे,पाचोडजवळ वीज कोसळली, कुठे हानी, पूर परिस्थिती नाही.

बीड : बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ६५ पैकी ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी.

जालना : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी. परतूर तालुक्यात अतिवृष्टीची शक्यता