मराठवाड्यात पावसाची सर्वत्र हजेरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 14:50 IST2017-08-20T12:28:20+5:302017-08-20T14:50:05+5:30

तब्बल दोन महिन्याच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. नद्या, नाल्याला पाणी आले असून अनेक सकल भागात वस्तीमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Rain fall in Marathwada everywhere | मराठवाड्यात पावसाची सर्वत्र हजेरी  

मराठवाड्यात पावसाची सर्वत्र हजेरी  

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद : तब्बल दोन महिन्याच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. नद्या, नाल्याला पाणी आले असून अनेक सकल भागात वस्तीमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासात झालेल्या दमदार पावसाने मराठवाड्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. 

 

नांदेड : 

नांदेड - महापालिका आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात पाणी घुसले, निम्मे शहर जलमय, विक्रमी 144 मिलीमीटर पावसाची ( गत 24 तासात ) नोंद.


मुदखेड - शहराचा नांदेड सह इतर तालुक्याशी संपर्क तुटला. मुदखेड शहर जोडणारे प्रमुख राज्य व प्रमुख जिल्हा रस्त्यावर नदी नाल्याचे गेली पाच तासांपासून वाहत आहे पाणी.


धर्माबाद - धर्माबाद येथील तहसिल व भुमीअभिलेख कार्यालयाला  पावसाच्या पाण्याने वेढले . छोटे छोटे पुलावरून पाणी ओसंडुन वाहात आहे. 

आल्लुर गावातील बहुतांश घरात पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे.

लातूर :  
देवणी - कालदुपारपासून सुरु झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले. मुख्य पीक सोयाबीनला याचा अधीक फायदा होणार आहे. तर काढणीस आलेल्र्या मुग वुडीद या पिकास या पावसाचा फटका बसनार आहे. 

उस्मानाबाद : जिल्हाभरात शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे लहान-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार  जिल्ह्यातील 16 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये उस्मानाबाद  तालुक्यातील सर्वच्या सर्व आठ मंडळाचा समावेश आहे. तसेच कळंब, परांडा,  उमरगा, तुळजापूर, वाशी तालुक्यातील प्रत्येकी एक तर भूम तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.तुळजापूर - शनिवारी सांयकाळी सहा वाजता सुरु झालेल्या पावसाचा तालुक्यात रात्रभर मुक्काम . त्यामुळे नाले ओढांना पुर , साठवण तलाव व मध्यम प्रक्लपातील पाणी साठयात वाढ ,खरीप पिकास संजीवनी . तालुक्यात तेरा तासात सरासरी ५० मि मी पावसाची नोंद.

परभणी : 
गंगाखेड - तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारी गंगाखेड परीसरात मध्यम स्वरूपाच्या पाऊसाने हजेरी लावली दिवसभर रिपरिप असलेल्या पाऊसाचा मध्यरात्री जोर वाढला रविवार रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यानंतर पाऊस सामान्य झाला शनिवार व रविवार रोजी सकाळ पर्यंत झालेल्या पाऊसामुळे परिसरातील नदी, नाले भरून वाहू लागले.या पाऊसामुळे गंगाखेड बस स्थानकाला गळती लागली असून बस स्थानक परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे.

 

औरंगाबाद: रात्रभर पावसाची रिपरिप पडल्यानंतर रविवारी पहाटे पावसाने जोर पकडला. औरंगाबादमध्ये मागच्या २४ तासांमध्ये ४१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात भीज पाऊस आहे, शेतीबाहेर पाणी नाही, जमिनीचे पोट भरले, जलसाठे फक्त ओले झाले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास जलसाठ्यात पाणी येऊ शकते, धुके खूप पडल्याने पिकावरील रोग वाढणार आहेत. जळगाव ते औरंगाबाद महामार्गावर धुके खूप आहे,पाचोडजवळ वीज कोसळली, कुठे हानी, पूर परिस्थिती नाही.

बीड : बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ६५ पैकी ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी.

जालना : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी. परतूर तालुक्यात अतिवृष्टीची शक्यता

Web Title: Rain fall in Marathwada everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.