दीर्घ विश्रांतीनंतर शहरात पाऊस
By Admin | Updated: September 25, 2014 00:56 IST2014-09-25T00:56:04+5:302014-09-25T00:56:20+5:30
औरंगाबाद : आॅगस्टअखेरपासून गायब झालेल्या पावसाचे बुधवारी पुनरागमन झाले.

दीर्घ विश्रांतीनंतर शहरात पाऊस
औरंगाबाद : आॅगस्टअखेरपासून गायब झालेल्या पावसाचे बुधवारी पुनरागमन झाले. शहर आणि परिसरातील अनेक भागांत पावसाने दुपारी तसेच रात्री चांगली हजेरी लावली. रात्री उशिरा पावसामुळे सातारा परिसर, शिवाजीनगरसह गारखेडा भागातील बहुतेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला.
जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे खरिपाची पिके तगली. परंतु त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला होता. आज दुपारी शहरातील मध्यवर्ती भागात पावसाने हजेरी लावली. अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. सायंकाळी ७ वाजेपासून पुन्हा अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. सिडको, हडको, शहराचा मध्यवर्ती भाग, सातारा, देवळाई परिसरात चांगला पाऊस झाला. पावसामुळे गारखेडा भागासह शिवाजीनगर, सातारा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत या भागात अंधार पसरला होता. चिकलठाणा वगळता उर्वरित भागांत सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चिकलठाणा वेधशाळेत पावसाची नोंद शून्य होती.