नळदुर्गसह परिसरात पाऊस
By Admin | Updated: April 16, 2016 00:14 IST2016-04-15T23:55:31+5:302016-04-16T00:14:06+5:30
नळदुर्ग : दिवसभराच्या कडाक्याच्या उन्हानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या.

नळदुर्गसह परिसरात पाऊस
नळदुर्ग : दिवसभराच्या कडाक्याच्या उन्हानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे उकाडा कमी होवून थंडावा निर्माण झाला. गुरूवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत होते. जिल्ह्याचे जवळपास ४२ अंश सेल्सीअस एवढे नोंदविले गेले. वाढलेल्या तापमानामुळे अबालवृध्द हैराण झाले आहेत. दरम्यान, दिवसभराच्या कडाक्याच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास नळदुर्गसह जळकोट, अणदूर, शहापूर, मुर्टा, होर्टी, वाघदरी आदी परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पाऊस सुरू असताना विद्युतपुरवठाही खंडित झाला होता. पावसांच्या सरीमुळे वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत झाली. (वार्ताहर)