दुहेरीकरणातील नव्या मार्गावर रेल्वे धावेल ८० कि. मी. वेगाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:37 IST2017-11-18T23:37:00+5:302017-11-18T23:37:04+5:30
रेल्वे प्रशासनाकडून सध्या नांदेड- मुदखेड या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यात परभणी- मिरखेल या १७ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. परंतु हे दुहेरीकरण नवीन असल्यामुळे त्यावरून रेल्वे जास्तीत जास्त ५० कि. मी. प्रतिघंटा या वेगाने धावू शकतात.

दुहेरीकरणातील नव्या मार्गावर रेल्वे धावेल ८० कि. मी. वेगाने
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वे प्रशासनाकडून सध्या नांदेड- मुदखेड या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यात परभणी- मिरखेल या १७ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. परंतु हे दुहेरीकरण नवीन असल्यामुळे त्यावरून रेल्वे जास्तीत जास्त ५० कि. मी. प्रतिघंटा या वेगाने धावू शकतात. या मार्गावरील गती ८० कि.मी. प्रतिघंटा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे देण्यात आली.
परभणी रेल्वेस्टेशनवर पॅसेंजर रेल्वे थांबविण्याचा प्रकार होत आहे. याविषयी रेल्वे प्रशासनातर्फे विविध माहिती देण्यात आली आहे. मनमाड-काचीगुडा आणि नगरसोल - नांदेड या दोन रेल्वे परभणी रेल्वेस्टेशनवर थांबविण्यात येत आहेत. १०० रेल्वे चालविण्याची क्षमता आहे, तिथे मुदखेड ते परभणीदरम्यान १५० रेल्वे धावत आहेत. यामुळे या मार्गावर भरपूर ताण आहे. एका गाडीस उशीर झाला की, त्याचा परिणाम इतर रेल्वेवर होतो.