शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

रेल्वेत महिलेचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास व दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:29 IST

औरंगाबाद : रेल्वेत महिलेचा विनयभंग करणारा प्रभूलाल शंकरलाल यादव याला सोमवारी (दि.१८) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.ए. हुसेन यांनी सहा ...

औरंगाबाद : रेल्वेत महिलेचा विनयभंग करणारा प्रभूलाल शंकरलाल यादव याला सोमवारी (दि.१८) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.ए. हुसेन यांनी सहा महिने सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला.पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती २३ एप्रिल २०१४ रोजी तिच्या एका नातेवाईकासोबत लग्नासाठी परतूर येथे गेली होती. लग्न लागल्यानंतर दोघे त्याचदिवशी सायंकाळी ५.३० च्या सुमारास काचिगुडा-मनमाड पॅसेंजरने औरंगाबादकडे निघाले होते. गाडीत गर्दी असल्यामुळे संबंधित महिला रेल्वेच्या दरवाजाजवळ उभी होती. दरम्यान, जालना येथे दोन ते तीन व्यक्ती रेल्वेतून खाली उतरत असताना आरोपी प्रभूलाल शंकरलाल यादव (५३, रा. वजिराबाद, नांदेड) याने महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर पळण्याचा प्रयत्न करीत असतानाच फिर्यादी व तिच्या नातेवाईकाने सहप्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडले. त्याला गाडीत बसवून औरंगाबादला आणले व पोलिसांच्या हवाली केले.खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३५४ (अ) अन्वये सहा महिने सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून सोपान धुमाळ यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी