रेल्वे प्लॅटफॉर्म कामाला लेट़़़
By Admin | Updated: December 3, 2015 00:37 IST2015-12-03T00:23:47+5:302015-12-03T00:37:14+5:30
श्रीपाद सिमंतकर , उदगीर सातत्याने संघर्ष करुन मंजुरी मिळालेल्या दुसरा प्लॅटफॉर्म व पादचारी पूल काम सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असून हे काम ‘लेट’ होत आहे़ दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाने

रेल्वे प्लॅटफॉर्म कामाला लेट़़़
श्रीपाद सिमंतकर , उदगीर
सातत्याने संघर्ष करुन मंजुरी मिळालेल्या दुसरा प्लॅटफॉर्म व पादचारी पूल काम सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असून हे काम ‘लेट’ होत आहे़ दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाने निधीच्या कारणावरून मंजुरीला विलंब लागला आणि आता मंजुरीनंतरही तेच पालुपद लावण्यात आले आहे़
निजाम काळात उदगीर रेल्वे स्थानकात दुसरा प्लॅटफॉर्म व गोमादासह मालधक्का होता़ तसेच रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी दिलेला खा़ डॉ़ जर्नादन वाघमारे यांच्या फंडातून दोन कोटी रुपयांचा निधीदेखील योग्य विनीयोग झाला नाही़ उदगीर स्थानकात गाड्यांना केवळ दोन मिनीट थांबा आहे़ दोन गाड्यांची क्रॉसींग असताना प्रवाश्यांना होणारी अडचण लक्षात घेता उदगीर रेल्वे संघर्ष समितीने दुसरा प्लॅटफॉर्म व पादचारी पुलासाठी पाठपूरावा सुरु केला़ काही वर्ष निधी नाही हे कारण ढकलत हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला़
नोव्हेंबर २०१४ मध्ये लोकमत ने या बाबतीत ‘प्लॅटफॉर्म’ ची गाडी रुळावरून सरकेना या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही दिवसात मंजुरी मिळाली़ पंरतू, प्रशासनाने कामात दिरंगाई करत आपले पालुपद कायम ठेवले़ मे २०१५ च्या बैठकीपर्यंत टेंडर प्रक्रियेला वेग मिळाला नाही़ २९ जुलै १५ रोजी अखेर टेंडर नोटीस निघाली व ८ सप्टेंबर रोजी हे टेंडर सोडण्यात आले़
७४ लाख ९२ हजार २५८ रुपयांचे हे टेंडर सुटल्यापासून तीन महिने पूर्ण होण्यास आले आहेत तरीदेखील प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही़ हे काम पूर्ण करण्याचा अपेक्षा कालावधी सहा महिने व देखभाल कालावधी सहा महिने ठरवून दिला आहे़ तीन महिने काम न सुरु झाल्यामूळे हे काम वेळेत पूर्ण होणार नाही हे स्पष्टच आहे़ पण त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे हे काम सुरु कधी होणार आणि विलंबाचे कारण काय आहे़ उदगीर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली, उत्पन्न वाढले पण विकास कामे मात्र काहीच नाहीत अशी सद्यस्थितीत अवस्था आहे़ दुसऱ्या प्लॅटफॉर्म चे काम त्वरीत सुरु करण्याची मागणी उदगीर रेल्वे संघर्ष समिती करीत आहे़