औरंगाबादेतील रेल्वे फाटक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:51 IST2017-10-05T00:48:36+5:302017-10-05T00:51:24+5:30

देवळाई-शिवाजीनगर रेल्वे फाटक बुधवारी रात्री जाम झाल्याने सातारा, देवळाई, गांधेली परिसरातील नागरिकांना संग्रामनगर पुलावरून मोठा फेरा घेऊन जाण्याचा त्रास सहन करावा लागला

 Railway gate junk in Aurangabad | औरंगाबादेतील रेल्वे फाटक जाम

औरंगाबादेतील रेल्वे फाटक जाम

ठळक मुद्दे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी

औरंगाबाद : देवळाई-शिवाजीनगर रेल्वे फाटक बुधवारी रात्री जाम झाल्याने सातारा, देवळाई, गांधेली परिसरातील नागरिकांना संग्रामनगर पुलावरून मोठा फेरा घेऊन जाण्याचा त्रास सहन करावा लागला, तर बहुतांश नागरिकांनी पटरीपलीकडे गाड्या फरफटत नेण्याची जीवघेणी कसरत करून घर गाठले.
     बुधवारी रात्री ११ वाजेपासून रेल्वे फाटक जाम झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विविध कार्यालयेव कारखान्यांतून घरी जाणाºया नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. शिवाजीनगर रेल्वे फाटक चौकीचा चौकीदार फाटक उघडण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु ते जाम झाल्याने त्याचे सर्व प्रयत्न असफल झाले. रेल्वेगेट उघडण्याची अनेक जणांनी किमान एका तासापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा केली. अखेर प्रवाशांनी संग्रामनगर पुलावरून परतणे पसंत केले. रात्री उशिरापर्यंत ते गेट बिघाड झाल्याने बंदच होते.  

 

 

Web Title:  Railway gate junk in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.