शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात रेल्वे विद्युतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:42 IST

मनमाड-मुदखेड या ३९० कि़मी. अंतराच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामाची निविदा प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण मार्चमध्येच पूर्ण झाले असून, पुढील वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देदळणवळणास गती : मनमाड-मुदखेड रेल्वेमार्ग विद्युतीकरणाची आॅक्टोबरमध्ये निघणार निविदा

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनमाड-मुदखेड या ३९० कि़मी. अंतराच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामाची निविदा प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण मार्चमध्येच पूर्ण झाले असून, पुढील वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रदूषण, इंधन खर्च यासह इतर बाबींमुळे देशातील सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या निर्णयाचे टष्ट्वीटदेखील त्यांनी दोन दिवसांपूर्वी केले आहे. गत वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात मनमाड-मुदखेड या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यासाठी सर्वेक्षण निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार या मार्गाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ही प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तांत्रिक कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात मनमाड ते मुदखेड आणि दुसºया टप्प्यात परभणी ते परळी वैजनाथ आणि पूर्णा ते अकोला असे काम केले जाणार आहे. मनमाड-मुदखेड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामाची निविदा प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया जवळपास दोन महिने सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रस्तावित कामास प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. या मार्गाचे काम कालबद्ध नसले तरी लवकर पूर्ण करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्धार आहे.वाहतूक सुलभ होणाररस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक सुलभ आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. जालन्याजवळ ड्रायपोर्ट होत आहे. हा पोर्ट कार्यान्वित झाल्यानंतर कृषी उत्पादनांसह स्टील, बियाणे व इतर उत्पादने रेल्वेमार्गाने जेएनपीटी व मुंबईत घेऊन जाणे सोयीचे ठरणार आहे.दोन टप्प्यांत विद्युतीकरणरेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मनमाड ते मुदखेड या मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर दुसºया ठप्प्यात परभणी ते परळी वैजनाथ आणि पूर्णा ते अकोला या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.....तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया राबविण्यास काहीसा विलंब झाला; पण नियोजित वेळेत ही पूर्ण होणार असल्याने साधारणपणे फेब्रुवारीत प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकणार आहे.- राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दक्षिण-मध्य रेल्वे विभाग, नांदेड

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाrailwayरेल्वे