शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे, विमान प्रवाशांची ‘तुंबई’, ट्रॅव्हल्सचे वाढले ‘कॅन्सलेशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:55 IST

इंडिगोचे रात्रीचे विमान रद्द : मुंबईहून येणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, इतर रेल्वेंना विलंब

छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील मुसळधार पावसाने मंगळवारी विमानसेवा आणि रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचा फटका छत्रपती संभाजीनगरातील प्रवाशांना बसला. इंडिगोचे मुंबईचे रात्रीचे विमान रद्द झाले. मुंबईहून येणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द झाली. मुंबईहून दुपारी निघणारी जनशताब्दी एक्स्प्रेस सायंकाळपर्यंत निघालेली नव्हती नंतर तीही रद्द झाली. तपाेवन आणि राज्यराणी एक्स्प्रेस उशिराने धावल्या, तर मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंतच धावली. परिणामी, प्रवाशांचा खोळंबा झाला.

छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी मंगळवारी सकाळी ०९:३० वाजता रवाना झालेली जनशताब्दी एक्स्प्रेस ही इगतपुरीपर्यंतच धावली. याठिकाणीही ही रेल्वे ४ तास उशिराने पोहोचली. इगतपुरी ते मुंबईदरम्यान ही रेल्वे रद्द करण्यात आल्याने पुढेही जाता येईना आणि मागेही येता येईना, अशी प्रवाशांची स्थिती झाली. दुसरीकडे मुंबईहून जनशताब्दी, राज्यराणी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही खोळंबा झाला. मुंबईहून १२:१० वाजता निघणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रात्री उशिरापर्यंत निघालेली नव्हती, तर राज्यराणी एक्स्प्रेस सायंकाळी ०६:४५ ऐवजी रात्री २२:३० वाजता मुंबईहून सुटण्याचे नियोजन करण्यात आले. मुंबईसाठी धावणारी एसटी नेहमीप्रमाणे धावल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

सकाळचे मुंबई विमान सव्वातास उशिराइंडिगोचे मुंबईहून सकाळी येणारे विमान मंगळवारी सव्वातास उशिराने आले, तर रात्री ०८:२५ वाजता शहरात दाखल होणारे आणि पुन्हा ०८:५५ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेणारे विमान रद्द करण्यात आले. याविषयी प्रवाशांना दुपारीच कल्पना देण्यात आल्याचे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.

एका बसमध्ये फक्त १० ते १२ प्रवासीशहरातून दररोज २४ ट्रॅव्हल्स धावतात. मुंबईला ये- जा करणाऱ्या ट्रॅव्हल्स धावल्या; परंतु मुंबईतील पावसामुळे प्रवास रद्द करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे केवळ १० ते १२ प्रवाशांना घेऊन बस धावल्या.-मोहन अमृतकर, सचिव, औरंगाबाद बस ओनर्स वेल्फेअर असोसिएशन

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊस