सराफांचे रेलरोको आंदोलन
By Admin | Updated: March 30, 2016 00:38 IST2016-03-30T00:28:32+5:302016-03-30T00:38:02+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारने ज्या जाचक अटी लावल्या आहेत, त्या रद्द कराव्यात या मागणीसाठी जिल्ह्यातील सराफा

सराफांचे रेलरोको आंदोलन
जालना : शहरासह जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारने ज्या जाचक अटी लावल्या आहेत, त्या रद्द कराव्यात या मागणीसाठी जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी जालना स्थानकात मंगळवारी अमृतसर- नांदेड या सचखंड एक्स्प्रेससमोर १५ मिनिटे आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या प्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
केंद्र शासनाने विविध प्रकारचे कर तर लावलेच आहे शिवाय इन्स्पेक्टरराज सुरू करण्याचा विचार आहे. यामुळे सराफा व्यापारी तसेच कारागीरही अडचणीत येणार आहेत. ही अट प्राधान्याने रद्द करण्याची मागणी सराफा व्यापाऱ्यांची आहे. या अटी रद्द कराव्यात म्हणून गत २५ दिवसांपासून सराफा दुकाने बंद आहेत.
या आंदोलनात जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक सराफा व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुसाने यांनी सांगितले. आंदोलन शांततेत झाल्याचे दुसाने म्हणाले.
या आंदोलनास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश राऊत, रेल्वे संघर्ष समितीचे गणेशलाल चौधरी, सुभाष देवीदान, प्रकाश जैन, फेरोज अली मौलाना आदींनी पाठिंबा
दिला.
यावेळी गिरधर लधाणी, पोपटसेठ गिंदोडिया, रितेश सेठिया, आनंद सुराणा, आनंद आबड, मोहन हिवरकर, संतोष शहाणे, सुधीर शहाणे, विजय विसपुते, अंकुश पडूळ, बालाजी वाघ्रूळकर, जग्गू प्रीथ्यानी, लाला मोतीवाला, रणजित कुलथे, राम शेडुते, नितीन दायमा आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
असोसिएशनच्या सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्रशासनाच्या विरोधात रेलरोको करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला जिल्ह्यातील ३०० सराफांनी आणि २०० सुवर्णकार कारागीर, रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी महासंघ, शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस, समाजवादी पार्टी आदींनी जाहीर पाठिंबा दिल्याचे सराफा असोसिएशचे अध्यक्ष महेश दुसाने यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या रेल्वेरोको आंदोलनास सराफा व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवित मोठी संख्येने उपस्थिती लावली. या आंदोलनात पाचशे पेक्षा अधिक सराफा व्यापारी तसेच कारागीर उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.