परळीत ‘रेल रोको’ आंदोलन

By Admin | Updated: June 26, 2014 00:35 IST2014-06-25T23:58:38+5:302014-06-26T00:35:48+5:30

परळी: रेल्वेप्रवासी भाड्यात व माल वाहतुकीच्या दरात झालेल्या वाढीच्या दरात काँग्रेस कार्यकर्ते बुधवारी रस्त्यावर उतरले़ कार्यकर्त्यांनी येथे मालगाडी अडवून प्रचंड घोषणाबाजी केली़

'Rail Roko' movement in parail | परळीत ‘रेल रोको’ आंदोलन

परळीत ‘रेल रोको’ आंदोलन

परळी: रेल्वेप्रवासी भाड्यात व माल वाहतुकीच्या दरात झालेल्या वाढीच्या दरात काँग्रेस कार्यकर्ते बुधवारी रस्त्यावर उतरले़ कार्यकर्त्यांनी येथे मालगाडी अडवून प्रचंड घोषणाबाजी केली़
केंद्र सरकारने सामान्यांची दिशाभूल केली असून कुठलेही कारण नसताना दरवाढ लादली असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला़ सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले़ यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रा़ टी़पी़ मुंडे, जिल्हाध्यक्ष प्रा़ सर्जेराव काळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले़ बाबूराव मुंडे, अ‍ॅड़ राजेसाहेब देशमुख, अ‍ॅड़ अनिल मुंडे, प्रकाश देशमुख, नवनाथ थोटे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक हिंगे, बाळासाहेब जटाळ, नीलाबाई रोडे, नारायण होके, प्रा़ विजय मुंडे, सूर्यकांत मुंडे, प्रदीप मुंडे, विश्वनाथ गायकवाड, जी़ एस़ सौंदळे उपस्थित होते़ प्रबंधक धनराज रोडे, नायब तहसीलदार बी़ एल़ रुपनर, फौजदार विश्वंभर पल्लेवाड यांना निवेदन दिले़
कार्यकर्ते झोपले रूळावर
आंदोलना दरम्यान काही कार्यकर्ते रेल्वे रूळावर झोपले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. यावेळी पोलिसांनी रेल्वे रूळावर झोपलेल्या कार्यकर्त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला.(वार्ताहर)

Web Title: 'Rail Roko' movement in parail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.