काँग्रेसतर्फे जालन्यात रेल रोको आंदोलन
By Admin | Updated: June 26, 2014 00:40 IST2014-06-26T00:07:55+5:302014-06-26T00:40:29+5:30
जालना : केंद्र सरकारच्या रेल्वे भाडे दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी जालना स्थानकावर मनमाड - नांदेड पॅसेंजर पाच मिनिटे अडवून रेल रोको आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसतर्फे जालन्यात रेल रोको आंदोलन
जालना : केंद्र सरकारच्या रेल्वे भाडे दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी जालना स्थानकावर मनमाड - नांदेड पॅसेंजर पाच मिनिटे अडवून रेल रोको आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या वतीने स्थानकासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
सकाळी १०.३० वाजता ही पॅसेंजर स्थानकात पोहोचली. त्याचवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्रसरकारच्या व भाववाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रेल्वे गाडी अडविली. विलास औताडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विमलताई आगलावे, ज्येष्ठ नेते बाबूराव कुलकर्णी, सुभाष काटकर, वसंत डोंगरे, संदीप गोरे, सदाशिव गाढे, अंकुश राऊत, राम सावंत, सत्संग मुंढे, डॉ. सुभाष ढाकणे, पं.स.चे उपसभापती सोपान तिरूखे, कृष्णा पडूळ, दीपक कावळे, नगरसेवक महेमूद कुरैशी, महावीर ढक्का, अरूण मगरे, संजय भगत, रमेश गौरक्षक, जफरखान, संजय खडके, शेख मोबीन आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष डोंगरे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. भाववाढीची ही सुरूवात असून अन्य वस्तू, भाजीपाला, अन्नधान्याचेही भाव वाढविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असा आरोप केला. या भाववाढीचा बोजा सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावर पडणार आहे, असेही डोंगरे म्हणाले.
या आंदोलनात गणेश गोरे, सय्यद मुसा, प्रकाश नारायणकर, मंजितराव टकले, ज्ञानेश्वर उगले, शीतल तनपुरे, मंगल खांडेभराड, लता खांडेकर, चंदाताई भांगडिया, मनोहर उघडे, निलेश खंडेलवाल, विलास जगधने, दीपक कायंदे, मोसीन पठाण, शेख शमसोद्दीन, सुनीता पवार, स्नेहल मगर, कृष्णा पारे, शाईन शेख, लीलाताई डोंगरे, शीलादीदी कपूर, सुमनबाई निर्मळ, विघ्ने, संगीता कांबळे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)