कचऱ्यामुळे अर्धातास थांबली रेल्वे
By Admin | Updated: August 3, 2016 00:18 IST2016-08-03T00:13:46+5:302016-08-03T00:18:44+5:30
औरंगाबाद : रेल्वेगाडीतील अस्वच्छतेमुळे मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांची साखरझोप उडाली. नगरसोल-नांदेड पॅसेंजरमधील बोगींतील अस्वच्छतेने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कचऱ्यामुळे अर्धातास थांबली रेल्वे
औरंगाबाद : रेल्वेगाडीतील अस्वच्छतेमुळे मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांची साखरझोप उडाली. नगरसोल-नांदेड पॅसेंजरमधील बोगींतील अस्वच्छतेने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्वच्छता झाल्याशिवाय रेल्वे पुढे रवाना होणार नाही, असा पवित्रा काहींनी घेतला. याविषयी प्रवाशांनी थेट दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांना मोबाईलवर संपर्क साधून तक्रार केली. अखेर बोगींची स्वच्छता झाल्यानंतरच ही रेल्वे पुढे रवाना झाली.
रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छता अभियानावर भर दिला जात असल्याचे दिसते. परंतु त्याच वेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातही पॅसेंजर रेल्वेगाड्यांमध्ये कायम कचऱ्याचे साम्राज्य असते. रोटेगाव,परसोडा, लासूर, पोटूळ आदी ठिकाणांहून शिक्षण,नोकरी,व्यवसायानिमित्त दररोज औरंगाबाद आणि जालना येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशा प्रवाशांना सकाळी ७ वाजता येणारी नगरसोल-नांदेड पॅसेंजर सोयीची ठरते. रेल्वे रवाना करण्याआधी प्रत्येक बोगीची स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या रेल्वेची नियमित साफसफाई करण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
अशा परिस्थितीमुळे प्रत्येक बोगीमध्ये कचऱ्याचे ढीग जमा झाले. त्यामुळे प्रवास करताना दुर्गंधीचा त्रास सहन करण्याची वेळ प्रवाशांवर येत होती. आज ना उद्या स्वच्छता होईल, असे प्रवाशांना वाटत होते. मात्र, या रेल्वेत कचऱ्याचे ढीग पाहून मंगळवारी सकाळी प्रवाशांचा संयम सुटला.
ही रेल्वे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आल्यावर प्रवाशांनी थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए.के.सिन्हा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. तसेच काहींनी बोगींमधील कचऱ्याचे छायाचित्रही त्यांना व्हॉटस् अॅपद्वारे पाठविले. रेल्वेची ही (पान ५ वर)