रेड्यांच्या टकरी, दोघांना अटक

By Admin | Updated: November 29, 2015 23:15 IST2015-11-29T23:04:24+5:302015-11-29T23:15:08+5:30

जालना: शहरातील औरंगाबाद मार्गावरील आरटीओ कार्यालय परिसरात भरविण्यात आलेल्या रेड्यांच्या टकरी पोलिसांनी उधळून लावल्या.

Raidy Takri, both arrested | रेड्यांच्या टकरी, दोघांना अटक

रेड्यांच्या टकरी, दोघांना अटक


जालना: शहरातील औरंगाबाद मार्गावरील आरटीओ कार्यालय परिसरात भरविण्यात आलेल्या रेड्यांच्या टकरी पोलिसांनी उधळून लावल्या. टकरीचे आयोजन करणाऱ्या दोंघाविरूद्ध चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
आरटीओ कार्यालय परिसरात रेड्यांच्या टकरी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने चंदनझिरा पोलिसांनी त्या ठिकाणी जावून टकरी रोखल्या. टकरीवर बंदी असल्याचे आयोजकांना माहिती दिली. तसेच आयोजन केल्याबद्दल घोंशीराम जटावाले व चेतन भगत या दोन जणाविरूद्ध हे. कॉ. शेख नजीर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा केला.

Web Title: Raidy Takri, both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.