जुगार अड्ड्यावर धाड ; एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:28+5:302020-12-17T04:28:28+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांना खबऱ्याकडून देवगाव-ताडपिंपळगाव शिवारात एका शेतात जुगार अड्डा सुरू ...

Raids on gambling dens; One lakh 60 thousand items confiscated | जुगार अड्ड्यावर धाड ; एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर धाड ; एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांना खबऱ्याकडून देवगाव-ताडपिंपळगाव शिवारात एका शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जोगदंड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यात आरोपी रमेश कचरू गायकवाड (वय ५०, रा. देवगाव रंगारी), राजू पुंडलिक खराते (५०, रा. ताड पिंपळगाव) वाल्मिक काशिनाथ गोरे (३४, रा. देवगाव रंगारी) मुस्तकीम हनिफ कुरेशी (३१), रघुनाथ वाळूबा सोनवणे (४०,रा. ताड पिंपळगाव), विठ्ठल पांडुरंग सोनवणे (६२ रा. ताड पिंपळगाव) या सहा आरोपींना अटक केली. तर अनिल बापू गायकवाड हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या कारवाईत ७ हजार ५०० रुपये रोख रक्कम, एक लाख साठ हजार किमतीची मोटारसायकल व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक विनोद तांगडे, सुदाम साबळे, पोलीस शिपाई मनोज लिगायत, होमगार्ड रामेश्वर गवळी यांचा कारवाईत समावेश होता.

Web Title: Raids on gambling dens; One lakh 60 thousand items confiscated