जुगार अड्ड्यावर धाड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:04 IST2021-04-16T04:04:21+5:302021-04-16T04:04:21+5:30

पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमठाणा येथील बीएएसएनएलच्या कार्यालयाजवळ चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड मारली. यावेळी शेख इमरान शेख ...

Raids on gambling dens; Charges filed against four persons | जुगार अड्ड्यावर धाड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर धाड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमठाणा येथील बीएएसएनएलच्या कार्यालयाजवळ चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड मारली. यावेळी शेख इमरान शेख कादर, समाधान तायडे व विजय सुभाष सिंघवी हे जुगार खेळताना व इतरांना खेळविताना आढळून आले.

त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल मिळून १७ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर मारलेल्या छाप्यात शेख इमरान शेख युसूफसह चालक विजय सुभाष सिंघवी यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह २ हजार २७० रुपये रोख व २९ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा ३१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दयानंद वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raids on gambling dens; Charges filed against four persons