राहुलला न्यायालयीन कोठडी; लक्ष्मी सापडेना
By Admin | Updated: December 28, 2015 23:26 IST2015-12-28T22:57:23+5:302015-12-28T23:26:30+5:30
बीड : अश्लील क्लिप तयार करुन ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपावरून पोलीस कोठडीत असलेल्या राहूलला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

राहुलला न्यायालयीन कोठडी; लक्ष्मी सापडेना
बीड : अश्लील क्लिप तयार करुन ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपावरून पोलीस कोठडीत असलेल्या राहूलला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ९ जानेवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून दिलेल्या ब्लॅकमेलिंग आणि सेक्स रॅकेट प्रकरणात राहूलला पोलिसांनी अटक केली होती. एका तरुणीच्या सहाय्याने त्याने वांगी येथील शाळेचा मुख्याध्यापक महादेव बजगुडे व त्या तरुणीची अश्लील क्लिप तयार करून बजगुडे याला ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
यापूर्वी ९ डिसेंबरला त्या तरूणीला बीड बसस्थानकावर बजगुडे याच्याकडून पैसे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर जामीनावर मुक्तता झाल्यानंतर त्या तरुणीने महादेव बजगुडे, केशव भांगे, गोपीनाथ पवार आणि लक्ष्मी नावाच्या तरुणीच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण दिले होते. राहूलला आपण ओळखत नसल्याचेही तिने सांगितले होते. (प्रतिनिधी)