राहुल गांधींच्या दौºयाने काँग्रेसला ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:44 IST2017-09-09T00:44:44+5:302017-09-09T00:44:44+5:30

काँग्रेसचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची शुक्रवारी झंझावाती सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी भाजपासह विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे, या सभेला कार्यकर्ते, पदाधिकाºयांसह शहरवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने राहुल गांधी यांचा दौरा काँग्रेससाठी नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.

Rahul Gandhi's visit to Congress | राहुल गांधींच्या दौºयाने काँग्रेसला ऊर्जा

राहुल गांधींच्या दौºयाने काँग्रेसला ऊर्जा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : काँग्रेसचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची शुक्रवारी झंझावाती सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी भाजपासह विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे, या सभेला कार्यकर्ते, पदाधिकाºयांसह शहरवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने राहुल गांधी यांचा दौरा काँग्रेससाठी नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.
येथील नवा मोंढा मैदानावर झालेल्या या सभेत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी विरोधकांचा समाचार घेतला. सत्तेची भाषा करणारी भाजपा आता खरी भाजपा राहिलेलीच नाही. भाजपाने मित्रपक्षांसह इतर पक्षांतून बेशरमपणे उमेदवार आयात करण्यावर भर दिला आहे. ज्यांना काँग्रेसने मोठे केले, पद, प्रतिष्ठा दिली असे काही जण आता इतर पक्षांच्या वळचणीला जाऊन थांबले आहेत. अशा दलबदलूंना नांदेड शहरातील जनता आगामी निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गांधी कुटुंबाने नांदेडला नेहमीच ताकद दिली आहे. आजही राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये येऊन आम्हाला बळ दिल्याचे सांगत नांदेडबरोबरच येणाºया काळात महाराष्टÑात आणि देशातही काँग्रेस पुन्हा नव्या ताकदीने उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
खा. चव्हाण यांच्या भाषणाचा हाच धागा पकडत आ. भाई जगताप यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. गद्दारांच्या जिवावर निवडणुका जिंकता येत नसतात हे भाजपाने लक्षात घ्यावे, असे सुनावत नांदेड शहर स्मार्ट सिटी करण्याची भाषा केली जात आहे. अगोदर नागपूर तर स्मार्ट करा, असा चिमटा त्यांनी काढला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आ. जोगेंद्र कवाडे यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करतानाच आज देशभक्तीचा ठेका घेतल्याप्रमाणे बोलणाºया भाजपाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपले योगदान काय? याचाही हिशेब द्यावा, असे सुनावले. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात १७१ जवान शहीद झाले होते. मात्र भाजपा पुरस्कृत एनडीए सरकार आल्यापासून तीन वर्षांत ७५० जवान शहीद झाल्याचे सांगत सर्वच पातळ्यांवर केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका आ. कवाडे यांनी केली.
आ. अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात गुजरातमध्ये झालेला अहमद पटेल यांचा विजय ही देशातील राजकारणाच्या बदलाची नांदी असल्याचे सांगत दलित, मुस्लिम समाजाने एकजुटीने काँग्रसला ताकद द्यावी, असे आवाहन केले. नोटाबंदीच्या निर्णयावर घणाघाती टीका करीत भाजपा प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी तीन महिने अगोदरच नोटा बदलून घेतल्याचा आरोप केला. यावेळी आ. शरद रणपिसे, रमेश बागवे यांचीही भाषणे झाली. आ. रणपिसे यांनी काँग्रेसचा इतिहास देशाला उभारी देणारा असल्याचे सांगितले. तर बागवे यांनी काँग्रेस कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या हिताची लढाई लढत असल्याचे सांगत या लढाईला नांदेडकरांनी बळ द्यावे, असे आवाहन केले.
भाजपाने देशाचे आणि राज्याचे वाटोळे केले आहे. ते आता नांदेडमध्ये येत आहेत. तोडाफोडीच्या राजकारणाला नांदेडकर थारा देणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत नांदेडच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी येणाºया निवडणुकीत भाजपाला चारीमुंड्या चित करीत काँगे्रसला ताकद द्या, असे आवाहन राजूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
यावेळी पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, बाळासाहेब थोरात, आ़अब्दुल सत्तार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, खा. रजनी सातव, आ़ अमिता चव्हाण, आ़ डी़ पी़ सावंत, आ़ वसंतराव चव्हाण, आ़ बस्वराज पाटील, धीरज देशमुख, महापौर शैलजा स्वामी, जि़ प़ अध्यक्षा शांताबाई पवार आदींसह पदाधिकाºयांची उपस्थिती होती़
मेळाव्याचे प्रास्ताविक आ़ अमरनाथ राजूरकर यांनी तर जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी आभार मानले़ सूत्रसंचालन प्रकाश निहलानी यांनी केले़ प्रारंभी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने खा़ राहुल गांधी यांचा भागींदरसिंघ घडीसाज, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, रवींद्र बुंगई आदींनी चोला, शिरोपाव आणि तलवार देऊन सत्कार केला़

Web Title: Rahul Gandhi's visit to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.