राहुल गांधींच्या दौºयाने काँग्रेसमध्ये चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:16 IST2017-09-08T00:16:19+5:302017-09-08T00:16:19+5:30
ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. महापालिका निवडणुकीत या दौºयाचा काँग्रेसला निश्चितच लाभ मिळणार आहे.

राहुल गांधींच्या दौºयाने काँग्रेसमध्ये चैतन्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. महापालिका निवडणुकीत या दौºयाचा काँग्रेसला निश्चितच लाभ मिळणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी सायंकाळी झाली. या निवडणुकीची रणनीती काँग्रेसने तयार केली आहे. त्यातच खा. राहूल गांधींचे शुक्रवारी नांदेडसह मराठवाड्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नांदेडमध्ये होणाºया विभागीय मेळाव्यात राज्यभरातील काँग्रेस नेते नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर काँग्रेसमय होईल. महापालिकेच्या रणधुमाळीची सुरुवातच काँग्रेसकडून धडाकेबाज होत आहे. त्यामुळे आधीच विखुरलेल्या विरोधकांना सावरण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे याचा लाभ ऐन निवडणुकीत काँग्रेस निश्चितपणे उचलणार आहे. काँग्रेसच्या ध्येय धोरणांना खा. राहूल गांधी यांच्यासह राज्यभरातून आलेले नेते शुक्रवारी उजाळा देतील. त्याचवेळी देशात नोटबंदी, कर्जमाफी, जीएसटी आदी विषयामुळे असलेली अस्वस्थताही जनतेपुढे ठेवली जाईल.
महापालिकेच्या स्थापनेपासून प्रारंभीचे एक वर्ष वगळता महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता आहे. ही सत्ता काबिज करण्याचे प्रयत्न होत असले तरी काँग्रेसजणांचा विजयाचा विश्वास विरोधकांना सुरुवातीपासूनच बॅकफुटवर नेणारा आहे.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे एकहाती नेतृत्व, विकासाची ध्यास तसेच दिवंगत शंकरराव चव्हाणांचे नांदेडसह मराठवाड्यासाठी केलेले कार्यही काँग्रेसला यशाकडे नेणारे आहे. महापालिका निवडणुकीची सूत्रे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आणि माजी राज्यमंत्री आ. डी.पी. सावंत यांच्या हाती सोपवल्याचे खुद्द खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. राजूरकरांचे आक्रमक तर सावंतांचे संयमी नेतृत्व सर्वांना एकत्र बांधणारेच ठरणार आहे.