राघुचीवाडीत दरोडा

By Admin | Updated: August 10, 2014 02:21 IST2014-08-10T02:13:31+5:302014-08-10T02:21:09+5:30

उस्मानाबाद : पैशाची मागणी करीत सालगड्यास काठी, कोयता, दगडाने जबर मारहाण करीत गंभीर जखमी करणाऱ्या चौघा दरोडेखोरांविरूध्द शहर

Raghuwadi robbery | राघुचीवाडीत दरोडा

राघुचीवाडीत दरोडा



उस्मानाबाद : पैशाची मागणी करीत सालगड्यास काठी, कोयता, दगडाने जबर मारहाण करीत गंभीर जखमी करणाऱ्या चौघा दरोडेखोरांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली़
पोलिसांनी सांगितले की, राघुचीवाडी शिवारातील बब्रुवान बलवंडे यांच्या शेतात राजशेखर बसवंतराव रेड्डी (रा़दुधाळ ता़सिंदगी जि़विजापूर) हे सालगडी म्हणून काम करतात़ शनिवारी पहाटेच्या सुमारास रेड्डी हे दोन मुलींसह शेतातील घरात झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चार दरोडेखोरांनी घरावर दगड मारत, लाथा मारून दरवाजा उघडला़ आतमध्ये घुसून रेड्डी यांना पैसे कोठे ठेवलेत, अशी विचारणा करीत कोयता, काठ्या, दगडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले़ गंभीर जखमी रेड्डी यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ याबाबत रेड्डी यांच्या फिर्यादीवरून वरील चौघाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Raghuwadi robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.