रॅगिंग प्रकरणात होऊ शकते शिक्षा
By Admin | Updated: August 30, 2014 00:00 IST2014-08-29T23:43:09+5:302014-08-30T00:00:35+5:30
परभणी : रॅगिंगसारख्या गुन्ह्यामध्ये आरोपीस किंवा त्याच्या पाठिशी घालणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंडाची तरतूद आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जे.एन.कातडे यांनी दिली.

रॅगिंग प्रकरणात होऊ शकते शिक्षा
परभणी : रॅगिंगसारख्या गुन्ह्यामध्ये आरोपीस किंवा त्याच्या पाठिशी घालणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंडाची तरतूद आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जे.एन.कातडे यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या वतीने नुकतेच कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, रॅगिंग कायदा, संगणक, इंटरनेटविषयक कायदा, शिक्षणाचा अधिकार, बालगुन्हेगारी आदींविषयी माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश एस.एस.सय्यद हे होते. प्रास्ताविक ज्ञानोपासक महाविद्यालयाचे डॉ.सुनील शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अधीक्षक पी. व्ही. काळे यांनी केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक जे.एन.कातडे, डब्ल्यू.एस.वाघमारे, जीवन पेडगावकर, एम.जे. बोबडे, के.एम.मोरे, प्राचार्य पी.एल.मोरे, प्रा.एम.एन.सोंडगे, प्रा.डॉ.सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रॅगिंग कायदेविषयक माहिती देताना कातडे यांनी रॅगिंग कशी केली जाते, याची माहिती सोप्या भाषेत दिली. मोठ्या शहरांममध्ये इंजिनिअरिंग, वैद्यकीय, एम.बी.ए.अशा महाविद्यालयामध्ये हे प्रकार होतात. रॅगिंग म्हणजे एखाद्या महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश केला तर त्या महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थी पायात सतत बूुट घालून ठेवण्यास सांगतात, विचित्रपणे टाँन्ट मारणे, मानसिक, शारीरिक छळ करणे हे कृत्य रॅगिंग कायद्यात मोडते. असे कृत्य होत असेल तर तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा १०९१ या हेल्पलाईनवर विनामूल्य सेवा दिली जाते, असे त्यांनी सांगितले. डॉ. डी.एस. रामढवे यांनी तंबाखूचे दुष्परिणाम, अॅड.जीवन पेडगावकर यांनी सायबर कायदा, अॅड.बोबडे यांनी शिक्षणाचा हक्क कायदा, अॅड. वाघमारे यांनी बालगुन्हेगारी याविषयी मार्गदर्शन केले. के.एम. मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सह.दिवाणी न्यायाधीश एस.एस.सय्यद म्हणाले, आपण कायद्याचे पालन करावे व एक चांगला समाज घडविण्यासाठी योगदान द्यावे. चांगला समाज घडला तर शहर, गाव आणि पर्यायाने तालुक्याची, जिल्ह्याची व राष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.