रेशनचे चार दुकान केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:51 IST2017-07-27T23:51:21+5:302017-07-27T23:51:21+5:30
परभणी : जिंतूर तालुक्यातील सहा रेशन दुकानांची गुरुवारी जिल्हाधिकारी पी़ शिवा शंकर यांनी अचानक तपासणी केली़ त्यापैकी चार रेशन दुकानांच्या दस्ताऐवजामध्ये अनियमितता आढळल्याने व बंद असल्याने ही दुकाने त्यांनी सील केली आहेत़

रेशनचे चार दुकान केले सील
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील सहा रेशन दुकानांची गुरुवारी जिल्हाधिकारी पी़ शिवा शंकर यांनी अचानक तपासणी केली़ त्यापैकी चार रेशन दुकानांच्या दस्ताऐवजामध्ये अनियमितता आढळल्याने व बंद असल्याने ही दुकाने त्यांनी सील केली आहेत़
जिल्हाधिकारी पी़ शिवा शंकर गुरुवारी जिंतूर तालुक्याच्या दौºयावर होते़ या दौºयात त्यांनी ५० लाभार्थ्यांपेक्षा कमी धान्य नेणाºया रेशन दुकानांची तपासणी केली़ त्यामध्ये चारठाणा येथील विठ्ठल सखाराम भवरे हे गैरहजर असल्याने त्यांचे क्रमांक ३ व ४ ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली़ तर खाजामियाँ देशमुख हेही गैरहजर असल्याने त्यांच्या दुकानालाही जिल्हाधिकाºयांनी सील ठोकण्याचे आदेश दिले़ सदाशिव खंडेराव निकाळजे यांच्या दुकानाची तपासणी केली असता, त्यामध्ये सर्व दस्ताऐवज व्यवस्थित असल्याचे दिसून आले़ यावेळी त्यांनी निकाळजे यांच्या कामकाजाचे कौतुकही केले़ त्यानंतर त्यांनी रायखेडा येथील दहीभाते यांचे रेशन दुकान तपासले़ तेथील रेकॉर्ड व्यवस्थित होते़ अकोली येथील रोकडे यांचे रेशन दुकान तपासले असता त्यामध्ये अनियमितता आढळून आल्याने हे दुकान सील करण्यात आले़ सील करण्यात आलेल्या दुकानांची सखोल चौकशी करण्याचे त्यांनी जिंतूर तहसीलदारांना निर्देश दिले़ यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार एस़ए़ घोडके आदींची उपस्थिती होती़