भटक्या जनावरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:58+5:302020-12-17T04:30:58+5:30

याविषयी सांगताना औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या अध्यक्षा बेरील सँचिस म्हणाल्या की, कुत्रे आणि इतर मोकाट जनावरे रात्रीच्या वेळी अन्नाच्या ...

Radium belt around the neck of stray animals | भटक्या जनावरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट

भटक्या जनावरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट

याविषयी सांगताना औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या अध्यक्षा बेरील सँचिस म्हणाल्या की, कुत्रे आणि इतर मोकाट जनावरे रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात फिरत असतात. ही मोकाट जनावरे वाहनधारकांना न दिसल्यामुळे होणारे अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामुळे अनेकदा मुक्या प्राण्यांचा जीव जातो, तर वाहनधारकांना बरीच दुखापत होते. हे अपघात थांबविण्यासाठी मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचा पट्टा बांधण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे मोकाट जनावरे चटकन दिसून येतील आणि अपघात थांबतील.

यावेळी सहाय्यक आयुक्त भोंबे, मुख्य पशुपालन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे, अशोक हंगे यांच्यासह लायन्स क्लबचे राजेश राऊत, गिरीश पांडे, राधा तोरणेकर, सुनील ठोळे, किशोर वाघमारे, शेखर तोरणेकर, सचिन बडजाते, पूर्वी बॅनर्जी, जॉन सँचिस, क्षमा कुरे, शिव सरकुंडे, किशोर बागुल, प्रतीश सुरवसे, आकाश साबने, भालचंद्र सोनार, मासूम सय्यद, मंगल सोनवणे यांची यावेळी उपस्थिती होती.

फोटो ओळ :

भटक्या कुुत्र्यांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधताना औरंगाबाद पेट लव्हर्सचे सदस्य.

Web Title: Radium belt around the neck of stray animals