शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरात राडा! जुन्या वादातून दोन गट भिडले; तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:44 IST

सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

- बाबासाहेब धुमाळवैजापूर : तालुक्यातील खंडाळा येथे युवकांच्या दोन गटांत गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झालेल्या वादातून तिघांना चाकूने भोसकण्यात आले. यातील एकाचा मृत्यू झाला. मोईन मुक्तार शहा (वय २४ वर्षे) असे मयताचे नाव आहे, तर शेख अबरार आरीफ शेख ( वय २३) व शोएब असीम पठाण (वय २३) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

खंडाळा येथे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास युवकांच्या दोन गटात वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटांतील व्यक्ती एकमेकांवर चालून गेल्या. यावेळी मोईन मुक्तार शहा, शेख अबरार आरीफ, शोएब असीम पठाण या तिघांना काहींनी चाकूने भोसकले. यातील मोईन मुक्तार शहा याचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मयताचा मृतदेहही उपजिल्हा रुग्णालयातच आणण्यात आला. यावेळी संतप्त जमावाने उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तसेच आतील कागदपत्रे फेकून दिली.

दरम्यान, खंडाळा गावातील एकाच्या दुकानातील साहित्यही बाहेर काढून संतप्त जमावाने पेटून दिले. तसेच भायगाव येथील एका सलूनच्या दुकानातील साहित्यही जमावाने बाहेर फेकून पेटवून दिले. या घटनेमुळे खंडाळा गावात व वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. ही घटना जुन्या वादातून झाल्याचा अंदाज असून या प्रकरणी गौरव राजु अनर्थ ( रा. भायगाव), अक्षय सुरेश पवार, शेखर लक्ष्मण नन्नावरे, नंदु पोपट जानराव ( सर्व रा. खंडाळा) आणि अन्य तिघे या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव राजु अनर्थ याने साथीदारांच्या मदतीने मोईन मुक्तार शहा, शेख अबरार आरीफ, शोएब असीम पठाण यांच्यावर चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. रात्री पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी गावास भेट देऊन पाहणी केली.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, दोन आरोपी ताब्यातदरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात मृत मोईन मुक्तार शहा याचे नातेवाईक मोठ्याप्रमाणावर जमले आहे. आरोपींच्या अटकेची मागणी करत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणी पहाटे २ वाजता ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

परिस्थिती नियंत्रणात, कोणीही अफवा पसरवू नयेजुन्या वादातून स्टेटस ठेवल्यावरून हे वाद झाले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.  परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. घडलेल्या घटनेशी संबंधित प्रत्येक दोषीवर निश्चित कारवाई होईल.-सत्यजित ताईतवाले, पोलीस निरीक्षक, वैजापूर पोलीस ठाणे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी