शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
7
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
8
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
9
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
10
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
11
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
12
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
13
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
14
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
15
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
16
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
17
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
18
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
19
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
20
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:34 IST

तिकीट वाटपावरून एमआयएमच्या अधिकृत उमेदवारावर रॅलीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केला हल्ला; किराडपुऱ्यात तणावपूर्ण शांतता

छत्रपती संभाजीनगर: शहरातील एमआयएम पक्षातील अंतर्गत धुसफूस आता रस्त्यावर आली आहे. एमआयएमने महापालिकेसाठी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या आठ उमेदवारांच्या यादीवरून पक्षात मोठे बंड पाहण्यास मिळत आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील अधिकृत उमेदवाराने शुक्रवारी सायंकाळी काढलेल्या रॅलीवर पक्षातीलच नाराज गटाच्या समर्थकांनी हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आनंदाच्या मिरवणुकीत 'विघ्न' एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी आठ उमेदवारांची घोषणा केली होती. या यादीमुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने नाराजी पसरली होती. प्रभाग १२ चे अधिकृत उमेदवार शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता किराडपुरा भागातून रॅली काढत असताना, राममंदिर रोडवर ही दुर्घटना घडली. एका माजी नगरसेवकाचे समर्थक तिथे आले आणि त्यांनी अचानक रॅलीवर हल्ला चढवला.

उमेदवाराला मारहाण अन् गंभीर इशारा रॅली मंदिराजवळ पोहोचताच घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या समर्थकांनी केवळ रॅली उधळली नाही, तर अधिकृत उमेदवारालाही मारहाण केली. "पक्षाने या उमेदवारीचा फेरविचार करावा, अन्यथा किराडपुरा भागातून एमआयएमचे नाव संपवून टाकू," असा टोकाचा इशारा यावेळी देण्यात आला. हल्ल्याची तीव्रता पाहून उमेदवाराला हार-तुरे बाजूला ठेवून समर्थकांसह तिथून सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली.

पोलिसांची वेळीच मध्यस्थी घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून तणाव निवळला आहे. मात्र, उशिरापर्यंत या भागात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच पक्षात झालेल्या या बंडखोरीमुळे एमआयएमसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MIM infighting in Chhatrapati Sambhajinagar: Candidate assaulted by own party!

Web Summary : Internal conflict within Chhatrapati Sambhajinagar's MIM erupted publicly. Party workers attacked their own official candidate's rally over candidate selection. The candidate faced violence and threats, forcing police intervention to restore order. MIM faces a significant challenge amidst this internal rebellion.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन