जुगार अड्ड्यावर राडा

By Admin | Updated: April 4, 2015 00:32 IST2015-04-04T00:19:26+5:302015-04-04T00:32:30+5:30

जालना: शहरात खुलेआमपणे मुंबई कल्याण नावाचा जुगार अड्डा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे.

Rada at the gambling stand | जुगार अड्ड्यावर राडा

जुगार अड्ड्यावर राडा


जालना: शहरात खुलेआमपणे मुंबई कल्याण नावाचा जुगार अड्डा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या अडड्यावर शनिवारी दुपारी अचानकपणे सदर बाजार पोलिस ठाण्याच्या सुमारे १० ते १५ कर्मचाऱ्यांनी छापा मारला. तेव्हा पोलिस आणि बुकी चालकांत मोठा राडा झाला. फिल्मीस्टाईल झालेल्या या राड्यानंतर पोलिसांनी बुकी चालकांसह तेथील पाच जणांना अटक केली.
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कडबी मंडी भागात मुंबई कल्याण नावाचा मटका जुगार अड्डा आहे. या अडड्यावर आतापर्यंत अनेक वेळा पोलिसांनी छापे टाकून बुकीचालकांवर कारवाई केलेली आहे. ती बुकी पुन्हा सुरू झाल्याने शनिवारी सदर बाजार पोलिसांच्या एका पथकाने या ठिकाणी छापा मारला. तेव्हा तेथील आरोपी व पोलिसांमध्ये चांगलाच राडा झाला. पोलिसांना धक्काबुकी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बुकी चालक कमलकिशोर बंग, दिपक कमलकिशोर बंग (दोघे रा. कालिकुर्ती), शिवलिंग छगनअप्पा वीर (रा. काद्राबाद), सुनील बाबुराव राऊत (माळीगल्ली अंबड), विष्णू माणिकराव खांडेभराड (रा. इंदिरानगर) या पाच जणांना अटक केली. त्यांच्या विरूद्ध जुगार व शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून. सायंकाळी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणेअमलंदार गायकवाड यांनी दिली.

Web Title: Rada at the gambling stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.