शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

टोकाई कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये घुसून राडा; खंडणीसाठी दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:34 IST

गाळप हंगाम सुरू झाल्यापासून वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे.

वसमत ( हिंगोली) : टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांच्या केबिनमध्ये घुसून तिघांनी कारखाना चालवायचा असल्यास हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत कार्यकारी संचालकास मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी घडली.

गाळप हंगाम सुरू झाल्यापासून वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. २० फेब्रुवारी रोजी कार्यकारी संचालक प्रल्हाद गायकवाड यांच्या कक्षात कोंडबा सटवाजी कदम ( रा. वर्ताळा) , गंगाधर लोकेवार ( रा. कुरुंदा), अरविंद जाधव ( रा. सोमठाणा)  हे तिघे घुसले. मागील अध्यक्ष हप्ता देत असत, तुलाही जर कारखाना निट चालवायचा असेल तर आम्हाला सव्वा लाख रुपये हप्ता द्यावा लागेल. नाहीतर जीवे मारू अशी धमकी देत केबिनमध्ये गोंधळ घातला. खुर्च्या फेकून देत गायकवाड यांना खाली पाडून शिवीगाळ केली. 

याप्रकरणी संचालक गायकवाड यांनी कुरुंदा पोलीस ठाणे गाठून सहायक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्याकडे तक्रार दाखल केली. गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कोंडबा सटवाजी कदम, गंगाधर लोकेवार, अरविंद जाधव या तिघांविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साखर कारखान्यावरील राड्याची दुसरी घटना....काही दिवसांपूर्वी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी यांना ऊसतोड का देत नाही या कारणावरून कारखान्यावर मारहाण झाली. त्यानंतर आता टोकाई चे कार्यकारी संचालक प्रल्हाद गायकवाड यांच्या कक्षात घुसून खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीSugar factoryसाखर कारखानेCrime Newsगुन्हेगारी